मुंबईतील मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यकाळातील विकासासाठी मुंबईला तयार करण्याचे काम …
Read More »आदित्य ठाकरेंचे महापालिकेसह शिंदे गटाला आव्हान, या प्रश्नांची उत्तरे द्या सिमेंट रस्त्याच्या कंत्राटावरून विचारले थेट प्रश्न
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद मुंबई महापालिकेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे करण्याची घोषणा करत त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची निविदा जाहिर करत त्याचे वाटपही केले. या निविदा वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत निविदा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच …
Read More »आदित्य ठाकरेंचा इशारा, स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईचे एटीएम करू नका खोके सरकार मुंबईला विकायला निघालंय; मुंबईला विकू नका
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे …
Read More »मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या मेट्रोची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणीः काय आहेत वैशिष्टे मेट्रो ७, मेट्रो २अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल-मुख्यमंत्री
मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांसाठी डबलडेकर टनेल मल्टी मॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलच्या माध्यमातून साकारण्याबाबत चर्चा
वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबई एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तंत्रज्ञांनी बैठक घ्यावी, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी यासंदर्भात …
Read More »गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा !: सचिन सावंत
मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत …
Read More »मुंबईला विशेष पोलीस आयुक्त नेमून समांतर प्रशासन चालवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रशासकीय यंत्रणेचे वाट्टोळे करु नका-अतुल लोंढे
मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे …
Read More »मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’ मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान होणार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे …
Read More »अजित पवारांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री शाहंना पत्राद्वारे कळविणार मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही
विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतरही कर्नाटकचे विधि मंत्री मधुस्वामी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य केले. तसेच मुंबईवर दावाही केल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून अजित पवार यांनी कर्नाटकला ताकीद देण्याची मागणी केली. …
Read More »कोंबडी शब्दावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळः भुजबळांनी शब्द मागे घेतला अजित पवारांनीही व्यक्ती केली दिलगिरी
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारी मुंबईप्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कोंबडी असा शब्द प्रयोग करताच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. दुपारच्या सत्रात मुंबईवरील चर्चेच्या वेळी छगन भुजबळ हे बोलायला …
Read More »
Marathi e-Batmya