काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा …
Read More »थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोले म्हणाले, शुभेच्छा, त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो माध्यमांशी थोरात बोलत असतील तर त्यांनीच विचारावं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो अशा सकाळीच शुभेच्छा दिल्या. तसेच थोरात यांनी राजीनामा दिला …
Read More »नाना पटोलेंची टीका, भाजपा टिळक कुटुंबाला विसरली कसबा व चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील
पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे लढवत आहे. या दोन्ही जागांवरही महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांची …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, मोदी सरकार अदानी समुहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते ? जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’ चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. खा. राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुल यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो …
Read More »सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर पहिल्यांदाच बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, हे पक्षिय राजकारण सत्यजीत तांबे चांगल्या मतांनी निवडूण आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. मात्र या निवडणूकीतील इतर उमेदवारांच्या चर्चेपेक्षा सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची झाली. तांबे यांच्या बंडखोरीबाबत अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत केलेले वक्तव्य, त्यानंतर नाना पटोले यांचे वक्तव्यांच्या …
Read More »सामान्य जनतेची गुंतवणूक अदानीच्या खिशात घालणाऱ्या मोदी सरकारविरोधात एल्गार प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस …
Read More »सत्यजित तांबेंच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर, वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला सत्यजीत तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते ?
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात …
Read More »विजयी झाल्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले, त्या कारणांमुळे मी अपक्ष म्हणून उभा राहिलो भाजपाकडे काँग्रेसनेच ढकलले
संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट केले निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर ते काँग्रेस …
Read More »अजित पवार यांच्या त्या विधानावर जयंत पाटील यांची सावध भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या त्यांच काम राष्ट्रवादीने केले
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेवार शुभांगी पाटील यांना जवळपास ४३ हजार मतं मिळाली. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली’ अशा आशयाचा गौप्यस्फोट केला. अजित पवार …
Read More »पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआचे उमेदवार उद्या जाहीर जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच …
Read More »
Marathi e-Batmya