महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …
Read More »नागपूरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपातर्फे भव्य स्वागत नागरिकांनीही सहभागी होण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर …
Read More »पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित …
Read More »कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय
कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »संजय राऊत लव्ह जिहादवरून म्हणाले, हिंदू मुलांकडूनही खून झालेत…
देशात आधीच लव्ह जिहादवरून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात या अनुषंगाने स्वतंत्र कायदाही आणण्यात आला. त्या पाठोपाठ राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थक विशेषत: भाजपाच्या आमदारांकडून महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कांगावा करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्यातच पालघरच्या श्रध्दा वालकरची …
Read More »संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी माफी मागितली तर मोदी जयजयकार का करतात?
काल दिवसभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजाविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी मागितली तर मग महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »राहुल गांधींची टीका, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर…
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …
Read More »राहुल गांधींचा टोला, तुमच्याशी ‘मन की बात’ नाही तर ‘तुमची मन की बात’ ऐकण्यास आलो
भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे. या पदयात्रेत दररोज हजारो लोक भेटून त्यांच्या समस्या सांगतात, तरुण मुले मुली शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. शेतक-याच्या शेतमलाला भाव मिळत नाही. काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात …
Read More »राहुल गांधींचा सवाल, मोदीजी, दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे काय झाले ? महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्दही काढत नाही
नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यिंची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली नोक-या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून करोडो लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोक-या कुठे …
Read More »
Marathi e-Batmya