Tag Archives: narendra modi

उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे

भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची …

Read More »

काँग्रेसची टीका, राजीनामा मंजूर करून केंद्राने कोश्यारींचा सन्मान केला तर महाराष्ट्राचा अवमान कोश्यारींच्या पापाची फळे भाजपाला भोगावी लागतील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली …

Read More »

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला निर्णय हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत अनादर व्यक्त करणारे वक्तव्य करत मराठी जनतेची मने दुखावणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र भाजपाला पोषक अशी भूमिका राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून घेण्यात येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री …

Read More »

पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यानंतरच राज्यपाल कोश्यारी पदमुक्त फक्त स्वागत आणि निरोपाला हजर रहात आपली नाराजी पहिल्यांदाच दाखविली

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यानंतरही पंतप्रधानांनी त्यांच्या इच्छेनुसार पदमुक्त केले नसल्याने वीस दिवसाच्या अंतराने मुंबईत दुसऱ्यांदा आलेल्या पंतप्रधान मोदीसोबत कार्यक्रमाला हजर राहण्यास असमर्थता दाखवित पहिल्यांदाच आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर लगेच एक दिवसाच्या …

Read More »

वाचा, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे काय खास, कोणत्या सुविधा आहेत यात? फडणवीस म्हणाले, रेल्वे आधुनिकीकरण- विस्तारीकरणासाठी पंतप्रधानांचे योगदान महत्वपूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पातील भरीव निधीमुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतिक मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा आले म्हणजे निवडणूका जवळ आल्या अदानी’ संदर्भात राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी कधी बोलणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील …

Read More »

गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी बंदीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली हिंदू सेनेची याचिका दाखल करून घेण्यास नकार

२००२ साली गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना गोध्रा दंगल झाली. त्या दंगलीवरून मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अखेर नरेंद्र मोदी आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांना निर्दोष ठरविले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी नुकतीच बीबीसीने जगभरात …

Read More »

सुप्रिया सुळेंचा सवाल, पंतप्रधानांनी पेन्शनरांना वचन दिले होते काय झाले त्याचे? पंतप्रधान मोदींनी काही राज्य सरकारांनी जूनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सुळे यांनी केली मागणी

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाला सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनी पेन्शनवरून काँग्रेसशासित राज्य सरकारांचे कान टोचत यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे भाकित केले. त्यामुळे जूनी पेन्शन योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाही विरोधात असल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »