ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून सध्या विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य तपासून त्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या हक्कभग प्रस्तावावर कारवाई करायची की नाही याबाबत विशेषधिकारी समिती स्थापन …
Read More »गॅस दरवाढीवरून “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको” म्हणत राष्ट्रवादीचा मोदींना टोला तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’,गालिबच्या शायरीतून महेश तपासे यांचा मोदींवर निशाणा...
“अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या …
Read More »अजित पवार यांचा सवाल, एकाबाजूला एसटीच्या पगारासाठी पैसे नाहीत अन… अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी ४० कोटी रुपयांची उधळपट्टी का
दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय, असा थेट सवाल उपस्थित करत ‘दावोस’च्या या अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या …
Read More »जितेंद्र आव्हाडांची मागणी, कुष्ठरुग्णांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासह सरकारी नोकरीत आरक्षणही द्या मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रमाणपत्रासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा
कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच त्यांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणही द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत केली. राज्यात एकाही कुष्ठरुग्णाला सरकारी नोकरी मिळालेली नाही हेसुध्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींची बोटे झडतात. त्यांना अपंगत्व येते. त्यानंतरही त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र …
Read More »आदित्य ठाकरे उभे राहताच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ऐ खाली बस, काय कळत तुला… अजित पवारांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेचा टोला
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो टन कांदा बाजारात विकूनही २ रूपये मिळल्याचे आणि १ रूपया जास्तीचा भरावा लागल्याची घटना उघडकीस आली. तसेच कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी आपला कांदा रस्त्यावर टाकून देत आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विधानभवनात आणि दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक पध्दतीने मांडत आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत कांदासह …
Read More »कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन
राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या …
Read More »अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान, चहापानावर बहिष्कार हा देशद्रोह कसा, सिध्द करा विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांची मागणी, वेलमध्ये विरोधकांची घोषणाबाजी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जर गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता अशी टीका केली. त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीला हसिना पारकर हिला पैसे दिले, तो मंत्री तुरुंगात …
Read More »अजित पवारांनी साधला अप्रत्यक्ष विधानसभाध्यक्षांवर निशाणा, नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले… शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप
विधिमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहात केला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बऱ्याचवेळा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक झुकते माफ देण्यात येत …
Read More »छगन भुजबळांचा सवाल, निकष पूर्ण केले तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच तासात छगन भुजबळांनी धरले धारेवर
मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच …
Read More »अजित पवार यांची उपरोधिक टीका,…जर आम्ही गेलो असतो तर तो महाराष्ट्र द्रोह ठरला असता हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे... कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे
पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल करतानाच अशा …
Read More »
Marathi e-Batmya