राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन …
Read More »जयंत पाटील म्हणाले, गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र फडणवीसजी ती चूक करू नका माजी अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांना सुचवले गांधीजींचे विचार...
महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करू नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र …
Read More »अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे म्हणाले, मी भेटलो आणि त्यांना… माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून..
नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांना खुलासा करावा लागला तर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातच आज निवडणूकीतील विजयानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत घेत …
Read More »अजित पवार यांच्या त्या विधानावर जयंत पाटील यांची सावध भूमिका महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या होत्या त्यांच काम राष्ट्रवादीने केले
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेवार शुभांगी पाटील यांना जवळपास ४३ हजार मतं मिळाली. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली’ अशा आशयाचा गौप्यस्फोट केला. अजित पवार …
Read More »पिंपरी-चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा दावा मात्र अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता
नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाचा दोन ठिकाणी महाविकास आघाडीने पराभव केला. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर असून या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही …
Read More »अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या होम टर्फवरच… सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे...
जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत असताना अजित पवारांचे मोठे विधान सत्यजीत तांबेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
नाशिकमधील तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या बंडाला भाजपाने दिलेली साथ आणि निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत आहेत. तसेच निवडूण आल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिकच्या जागेवर सत्यजीत …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले ? CM, DyCm नी केंद्राला विचारावा , शेजारच्या राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही
या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …
Read More »अजित पवार यांची खोचक टीका, ‘अमृत काळ’चे वेस्टन लावून मूळ प्रश्नांना बगल देणारा अर्थसंकल्प’ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प
लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. …
Read More »
Marathi e-Batmya