Tag Archives: ncp

सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, भाजपामध्ये कर्तृत्वान महिला भले आमदार नसल्या तरी पण भाजपाला महिलांचा आदर नाही

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद हीच्यात वाद सुरु आहे. तसेच या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही वाद निर्माण झडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

आरएसएसप्रमुख मुस्लिमांना घाबरू नका सांगतात आणि २४ तासात मुस्लिम नेत्यावर ईडीचे छापे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा उपरोधिक टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसप्रमुख  मोहन भागवत यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकते याबाबत महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजपा सातत्याने केंद्र सरकारचा वापर करत आहे. …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, या पाच जागा महाविकास आघाडी एकदिलाने लढविणार महाविकास आघाडीची बैठक पार पडली; पाचही जागांवर एकमत...

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, …

Read More »

हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप

आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …

Read More »

अतुल लोंढेची टीका, सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच भाजपाकडून ईडीचे छापे किरिट सोमय्यांनी आधी आरोप केलेल्या प्रकरणांचे काय झाले ?

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे मारले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षांना नाहक त्रास देण्यासाठीच गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. ईडीची आजची छापेमारी ही त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीचे छापेः कार्यकर्त्ये आक्रमक निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न

साधारणतः चार वर्षापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मनिलॉंन्डरींग केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावेळी त्यांच्या घरावर छापेमारी झाली. मात्र त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्या घरासह …

Read More »

अजित पवारांचा इशारा, संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर खपवून घेणार नाही राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार; अजित पवार यांची माहिती...

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली अशी …

Read More »

खेड्यातल्या कार्यकर्त्याच्या भाषणाच्या पुस्तकाचे अनावरण होणे यासारखे दुसरे भाग्य नाही पुस्तक प्रकाशनानंतर खासदार सुनील तटकरे मानले आभार

खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधिमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होतेय, यासारखे कुठलं भाग्य असू शकत नाही असा नम्रतापूर्वक उल्लेख खासदार सुनिल तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विधिमंडळातील भाषणांची पुस्तिका आज पक्षाचे नेते प्रफुल पटेल, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माणाची गरज चीन मधले उद्योग भारतात येण्याची शक्यता

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते …

Read More »