Tag Archives: ndrf

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परः फोन नंबर जाहिर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर …

Read More »

राज्याला पाऊसाने झोडपले! २१३ लोक पूराच्या पाण्यात अडकले एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू

राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील …

Read More »

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात : एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणा सज्ज नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पूर्व विदर्भातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे …

Read More »

झारखंडमध्ये पावसामुळे १६२ विद्यार्थी शाळेत अडकले एनएडीआरएफच्या जवान आणि पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांना वाचविले

झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या एका खाजगी निवासी शाळेत अडकलेल्या किमान १६२ विद्यार्थ्यांना रविवारी (२९ जून २०२५) पोलिसांनी वाचवले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचल्यानंतर शनिवारी (२८ जून) रात्रीपासून कोवाली पोलिस स्टेशन परिसरातील हळदीपोखर-कोवाली रोडवरील पंडारसोली येथील शाळेत विद्यार्थी अडकले होते. “मुसळधार पावसामुळे …

Read More »

राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० …

Read More »

उत्तराखंड हिमस्खलनात आणखी ३ जणांचे मृतदेह सापडलेः एक जण अद्याप बेपत्ता मृतांची संख्या आठवरः घटनास्थळी एकूण ५४ कामगार

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शुक्रवारी सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनात आणखी तीन मृतदेह सापडले आहेत आणि एक कामगार अजूनही बेपत्ता आहे, असे लष्कराने रविवारी सांगितले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या आठ झाली आहे. हिमस्खलन झाले तेव्हा घटनास्थळी ५४ कामगार होते. लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव म्हणाले, “शेवटच्या माणसाचा शोध …

Read More »

अजित पवार म्हणाले, …दुप्पट मदतीचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला …

Read More »

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि पुणे विभागात या गोष्टी करा आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहावे

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …

Read More »

मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई व परिसरात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. कालपासून  जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी …

Read More »

रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …

Read More »