मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पहात आहे. महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या झाली आणि ते …
Read More »वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे निधीची मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती
नागपूर: प्रतिनिधी लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याची माहिती डॉ.नितीन राऊत यांनी दिली. मागील …
Read More »स्कील नाही, मग पंतप्रधान मोदींचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी परप्रांतीय मजुर राज्याबाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ते स्कील नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का? असा सवाल करत मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण जाणीवपूर्वक करत असल्याची टीकाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील …
Read More »संशयित रूग्णांनो लपून राहू नका…अन्यथा आम्हाला कळवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित …
Read More »भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये
मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …
Read More »संकटातील अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी नागरीकत्व कायदा आणला भारतातील धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवारांची भीती
पुणेः प्रतिनिधी देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आणि संकटात असताना नागरीकत्व कायदा (CAA) कायदा आणून या मुळ मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच या कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार …
Read More »धारावीचा पुनर्विकास १० वर्षासाठी रखडला निविदा प्रक्रियाच पुन्हा नव्याने होणार
मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …
Read More »न बोलवताच २७ सप्टेंबरला स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नसल्याची शरद पवारांची स्पष्टोक्ती
मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक संचनालयाने अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्या विषयीची माहिती कळाल्याने ईडीला तपासात सहकार्य करण्यासाठी स्वतः २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जावून ते जे देतील तो पाहुणचार स्विकारणार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद …
Read More »केंद्र व राज्य सरकारची किमान वेतनवाढ कामगारांची थट्टा करणारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने कामगारांचे किमान वेतन दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय फसवा आणि कागदावरचाच आहे. ही वेतनवाढही दिल्ली, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामगार वर्गाला खूश करण्यासाठी केलेली व्यर्थ धडपड असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होताना जाता-जाता …
Read More »भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …
Read More »
Marathi e-Batmya