Tag Archives: rahul gandhi

राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना उबाठाला काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर सोम्या गोम्याच्या धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष भीक घालत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळ फासू, त्यांच्या ताफ्यवर दगडफेक करू अशी धमकी शिवसेना उबाठाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी इशारा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आमच्यासाठी आधी सावरकर आणि हिंदुत्व असे वादग्रस्त वक्तव्य करत राहुल गांधी यांना बाळा दराडे …

Read More »

विनायक सावरकर यांचे नाव संरक्षित कराः सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा निर्णय

मंगळवार (२७ मे २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी विचारवंत व्ही.डी. अर्थात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा, १९५० अंतर्गत संरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हजर राहून याचिकाकर्त्याने वैयक्तिकरित्या पंकज फडणवीस यांनी सांगितले …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …

Read More »

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जम्मू आणि काश्मीरला भेट शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कठोर परिश्रम करा, अधिक खेळा आणि “शाळेत भरपूर मित्र बनवा” – असा सल्ला विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुंछमधील क्राइस्ट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिला होता, ज्या शाळेने या महिन्याच्या सुरुवातीला अंदाधुंद गोळीबारात आपले दोन विद्यार्थी गमावले होते. राहुल गांधी शनिवारी पूंछ शहराला भेट देत होते. २२ एप्रिल …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या

पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …

Read More »

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्ली न्यायालयाचे ईडी चौकशीवर प्रश्नचिन्ह राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या संदर्भातील पुराव्याबाबत शंका

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तक्रारीची दखल घ्यावी की नाही यावर बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयाने युक्तिवाद सुरू केला. ईडीच्या मते, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या ₹२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या कथित फसवणुकीतून मिळालेल्या ‘गुन्ह्यातून मिळालेल्या …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली

ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप, हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या वक्तव्यावरून केली टीका

एकाबाजूला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेली कारवाई, त्यानंतर अचानक पाकिस्तानसोबत करण्यात आलेली युद्धबंदी आणि भारतीय वायु दलाचे अर्थात एअरफोर्जचे झालेले नुकसान यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. असे असताना देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ऑपरेशन सिंदूरची कारवाई करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला पूर्व कल्पना …

Read More »

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यामुळे दलित मतं पुन्हा काँग्रेसकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा चित्रपट पाहिला आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला भेट दिली

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी बिहारच्या दरभंगा येथे ‘शिक्षा न्याय संवाद’ मोहिमेची सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी समुदायापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात अनुसूचित जाती आणि जमाती (एससी आणि एसटी) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर, …

Read More »

शस्त्रसंधी, अमेरिकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची मागणी अधिवेशन बोलवा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र आक्षेप

काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेसने आज तीव्र आक्षेप घेतला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित सर्व पक्षियांची बैठक बोलवावी आणि त्यास स्वतः उपस्थित रहावे व संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावी अशी मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि …

Read More »