राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …
Read More »रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे आश्वासन
महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर निष्कासन कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व …
Read More »रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण …
Read More »बार्टीसाठी केंद्रीय मंत्री आठवले, शिंदे गटाच्या तीन आमदारांसह ४ जणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बार्टीचे प्रशिक्षण पूर्ववत सुरु करा
राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत देण्यात येणारे भरतीपूर्व प्रशिक्षण बंद केल्यामुळे समाजात नाराजीची भावना असून हे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरु करून विद्यार्थाना न्याय देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण …
Read More »रामदास आठवले म्हणाले, विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आज दुपारी १२ वाजता रामदास आठवले …
Read More »रामदास आठवले म्हणाले, महापरिनिर्वाण दिनी अनुयायांची संख्या जास्त असेल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ …
Read More »याला काय अर्थ आहे साने…आता मला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?
मी ही गोष्ट लिहित असताना आपले संजीव साने अनंतात विलिन होत असतील…! २००९ सालची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. मात्र, तेव्हाच महाराष्ट्रात एक आगळावेगळा प्रयोग केला गेला. राज्यातील सगळे डावे पक्ष, सगळे आरपीआय गट आणि …
Read More »रामदास आठवले यांची ग्वाही, आंतरजातीय विवाह योजनेतील जाचक अट शिथील करणार
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी यासंदर्भात असणारी हिंदू विवाह कायद्याचीम अट शिथिल करण्यासाठी प्रयन्त करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाने …
Read More »नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून लवकर त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज बांद्रा येथील अलीयावर जंग इन्स्टिट्यूट येथे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya