Breaking News

Tag Archives: revenue minister

मंत्री विखे-पाटील यांचे निर्देश, अवैध वाळू उपसा प्रतिबंधीत तर नवीन धोरणाची अंमलबजावणी करा महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी., असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन

राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे …

Read More »

वाळू उत्खननातील ठेकेदारी संपुष्टात, सरकारचे उत्पन्न वाढणार, नागरिकांना स्वस्त दरात रेती अनधिकृत उत्खननाला आळा घालणाऱ्या नव्या रेती धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या नव्या धोरणामुळे राज्यातील वाळू उत्खनन क्षेत्रातील माफिया राज संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा, आता थेट घरापर्यंत वाळू, गायरान जमिनीवरील घरांवर कारवाई नाही नगरपालिकांसाठी आता दोन तहसीलदार

राज्यातील बहुचर्चित वाळू लिलाव प्रक्रियेवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच अवैध वाळू उपशामुळे शासनाचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या अवैध वाळू उपशाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर गाड्या घालून जीवे मारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाळू लिलाव प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत लवकरच सुलभता आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील सन २००० पूर्वीच्या उद्योगांना आवश्यक जमीन अकृषिक करण्याकरिता येत असलेल्या अडचणीसंदर्भातील महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव …

Read More »

गौण खनिज उत्खनन प्रक्रिया ऑनलाईन होणार

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार …

Read More »