मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची खुर्च्यांची आदलाबदल होताच, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सवतासुभा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबध तर चांगलेच ताणले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, नीलम गोऱ्हे यांचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, यायलाच पाहिजे नव्हते ठराविक कालवाधीतील पक्षांचा कालावधी पाहता असे वक्तव्य करायला नको होते
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी …
Read More »संजय राऊत यांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर आरोप, प्रश्न लावायला पैसे घेतात, माझ्याकडे पुरावे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते त्यांनी बोलावं
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनात कसा मी घडलो या मुलाखत वजा कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर आज पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसैनिकांसह संजय राऊत यांनी एकच हल्लाबोल केला. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाच्या निकालाची प्रत मला मिळाली नाही मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …
Read More »नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया… उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने नीलम गोऱ्हे यांची सावध भूमिका
दिल्लीतील साहित्य संमेलनात मी कसा घडलो या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मुलाखत वजा कार्यक्रम करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देत …
Read More »नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप
९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »दिल्ली चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा आरोप, सरकारी आकडा खोटा.. दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून केला आरोप
काल रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. आणि दिल्ली रेल्वे स्थानकावर एकच धावपळ सुरु होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »भास्कर जाधव यांची नाराजी, क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही राजकारणातील सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरील भाषणाने
विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या भागातील नेत्यांना आणि पराभूत आमदारांना लक्ष करण्याचा सपाटा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सुरु केला आहे. त्यात कोकणातील पहिला मोहरा म्हणून राजन साळवी यांना पक्षात घेतले. राजन साळवी यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणातील शिवसेना उबाठाला धक्का बसला असल्याचे बोलले जात असतानाच ज्या …
Read More »संजय राऊत यांची टीका, बीडच्या लोकांनी … दुर्दैवाने खरं होताना दिसतय धनंजय मुंडे, सुरेश धस, वाल्मिक कराड यांच्या संबधावरून केली टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यास अटक केल्यानंतर आणि वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे संबध उघडकीस आले. त्यातच सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले. मात्र दोनच दिवसांपूर्वी भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, ‘कंपाउंडर’कडून औषध घेतल्याने पोटदुखी कधीच थांबणार नाही माजी आमदार राजन साळवींचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश
मराठी माणसाला तो पुरस्कार दिला त्याचा अभिमान पाहिजे, मात्र माझ्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला, साहित्यिकांचा अपमान केला आणि शरद पवार यांचाही अपमान केला. ही पोटदुखी कधीच थांबणार नाही कारण ते ‘कंपाउंडर’कडून औषध घेतात त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे, अशी उपरोधिक टीका शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे …
Read More »
Marathi e-Batmya