Tag Archives: sanjay raut

सरनाईक गुवाहाटीला गेल्याचा किस्सा सांगण्याऱ्या संजय राऊत यांनी दिली ‘नवी’ माहिती मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती

काही दिवसांपूर्वी दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, मला प्रताप सरनाईक यांचा फोन आला होता. त्यावेळी ते दिल्लीत गेले होते. तेथे सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांना थेट अमित शाह यांच्याकडे घेवून गेले. तेथे भेट झाल्यानंतर …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेचा सवाल, याचा अर्थ काय? ट्विट करत केला सवाल

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत सध्या तरी अनधिकृतरित्या फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंडखोर आमदारांना परत बोलविण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत असतानाच मागील एक-दोन दिवसांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकेची झोड उठविली. यावरून बंडखोर नेते एकनाथ शिंदे …

Read More »

दिपक केसरकर यांचे खुले पत्र: भाजपाची भलामण, संजय राऊतांवर निशाणा हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी... बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!

बंडखोरांची बाजू मांडण्यासाठी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी आज खुले पत्र लिहित शिवसेनेसाठी भाजपा कशी चांगली आहे आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपाबरोबर एकत्र येणे चांगले (?) यासह भाजपा नेते कसे शिवसेनेवर टीका करत नाही आदींसह अनेक मुद्दे मांडत या सर्वामागे संजय राऊत कसे कट कारस्थानी आहेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचा …

Read More »

ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांचे आव्हान, मला अटक करा बंडखोरानंतर आता राऊत टार्गेट

राज्यात सत्ता परिवर्तनाच्या उद्देशाने शिवसेनेत एकप्रकारे फूट पाडण्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतील ३९ आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेवून गुवाहाटी येथे तळ ठोकल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच राऊत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, म्हणे आता ती चड्डी-बनियन टोळी झाली तानाजी सावंत आणि प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला ३७ आमदारांसह काही अपक्ष आमदारांनी पाठींबा देत शिंदे गटात सहभागी झाले. सद्यपरिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचे विधिमंडळाच्या लढाईत पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, काल म्हणे गुवाहाटीत …

Read More »

संजय राऊत यांचे आव्हान; एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची वेळ सुरू महाविकास आघाडीचे सरकार मजबूत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर हे बंड क्षमविण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतण्याचे आवाहन केले. मात्र बंडखोर आमदारांकडून परतीच्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली …

Read More »

बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांचे आवाहन, तुम्ही येण्याची हिंमत… महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण परत या

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून समेटासाठी आणि बंडाळी क्षमविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सेना आमदारांना २४ तासात मुंबईला परतण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास …

Read More »

संजय राऊत म्हणाले, तर ‘हे’ आमदार संध्याकाळपर्यत मुंबईत पोहोचतील प्रताप सरनाईक नवी दिल्लीत तर सुहास कांदे सीबीआय कार्यालयात

शिवसेनेचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना नेत शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने वर्षा या निवासस्थानी सेनेच्या आमदारांची एक बैठक बोलाविली. या बैठकीत मुंबईत हजर असलेल्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीबाबत बोलताना सेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचा उमेदवार चमत्कारासाठी नाही तर… पाचही उमेदवार आमचेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत असा टोला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना लगावत शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात …

Read More »

संजय राऊत यांचा निशाणा, एक जागा जिंकली म्हणजे… विरोधकांचे नाव न घेता केली टीका

विधान परिषद निवडणूकीच्या १० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इन मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यातच आज शिवसेनेच्या ५६वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार ठेवण्यात आलेल्या हॉटेल वेस्ट इनमध्येच शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी …

Read More »