छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …
Read More »संजय शिरसाट यांची माहिती, धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षण समितीचा अहवाल तीन महिन्यात विधानसभेत दिली माहिती
धनगर किंवा बंजारा समाजावर कोणताही अन्याय होऊ नये, ही शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून ही समिती तीन महिन्यात अहवाल शासनास सादर करेल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत दिली. …
Read More »संजय शिरसाट यांचा इशारा, विद्यार्थी वसतीगृहातील भोजनाच्या दर्जात तडजोड नाही जेवणाच्या चवीत किंवा गुणवत्तेत त्रुटी आढळून आल्या
राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा व इतर सोयीसुविधांबाबत कोणतीही तडजोड राज्य शासन करणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील भोजन व इतर सोयीसुविधांबाबत सदस्य बाबासाहेब देशमुख …
Read More »सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो. मागील काही महिन्यांपासून …
Read More »रोहित पवार म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल दिल्लीलाच जावं लागेल राज्यात ओला दुष्काळ जाहीरकरण्याची गरज
राष्ट्रवादीच्या वतीने काल नाशिक शहरात महाराष्ट्रातील हिताचे प्रश्न घेऊन भव्य सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आल्या. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलो होतो. कर्ज माफी, शेतकरी, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांच्या मोबदला मिळाला पाहिजे. अहिल्याननगर, कर्जत जामखेड मध्ये पावसामुळे मोठ नुकसान झालं आहे. पावसामुळे कांदा, सोयाबीन पिकाचं मोठ नुकसान झालं. …
Read More »अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस १४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या समितीचा कालावधी १४ सप्टेंबर …
Read More »व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
राज्यातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त …
Read More »मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आदेश
रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात …
Read More »संजय शिरसाट यांची माहिती, १२० वसतिगृह २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्न सोहळा संपन्न
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय व …
Read More »
Marathi e-Batmya