Tag Archives: shivsena (UBT)

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाच्या आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव …

Read More »

विधानसभेत भास्कर जाधव यांचा हल्ला बोल, तर पत्र मागे घेतो… विरोधी पक्षनेता पदी निवड का नाही ?

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला. विधानसभेच्या विरोधी …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएल क्रिकेटमध्ये बेटींग आयपीएल बेटींगच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह सभापतींकडे सादर

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत बेटींग संदर्भातील पोलिसांच्या संभाषणाचा पेन ड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. …

Read More »

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या गाण्यावरून विधान परिषेदत गोंधळ कुणाल कामरा यांना अटक करण्याची भाजपा सदस्य प्रसाद लाड यांची मागणी

स्टॅड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर आणि दिल्लीतील पंतप्रधान मोदी यांच्यावर विडंबनात्मक गायलेले गाण आज सकाळी प्रसारीत झालं. त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी

नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. संजय …

Read More »

शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव आणि शिवसेनाओएफसी निलेश राणे यांच्यात चकमक लक्षवेधी सूचनांवरून उडाली चकमक

विधानसभेच्या  कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.  या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा  एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा  तालिका अध्यक्ष योगेश सागर …

Read More »

विधानसभेत नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी तर गृह राज्यमंत्री म्हणाले… दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची  व्यवस्थापक  दिशा सालियनच्या  मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या  याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या  दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी  आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना  अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या आरोपाप्रश्नी उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया,… मला आश्चर्य औरंगजेबाबात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने मांडलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावरून सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आज एकच गदारोळ विधानसभा आणि विधान परिषदेत केला. तसेच या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्याचे कारण पुढे करत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल …

Read More »

दिशा सालियन मृत्यू प्रकरणः चित्रा वाघ-मनिषा कायंदे-अनिल परब वाद, कामकाज स्थगित आदित्य ठाकरे यांच्या कथित नावावरून भाजपा आणि- शिवसेना उबाठा आक्रमक

बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापन दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जवळपास पाच वर्षानंतर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव त्या याचिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर न्यायालयात जर एखादी याचिका दाखल आणि …

Read More »

नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सत्ताधाऱ्यांनी जिकला, पण विरोधकांना बोलू न देता फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा आणून प्रस्ताव जिंकला

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याच्या विरोधात आणि त्यांच्या पक्षपाती वागण्यावरून विरोधी पक्षाच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी उपसभापती गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आज चर्चेला आणण्यात आला. मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधकांनाच या विषयावर बोलू न देता सत्ताधारी …

Read More »