श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रॉ प्रताप सरनाईक …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून जूनीच योजना पुन्हा एकदा सुरु
शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. वास्तविक पाहता काही वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्यावतीने राज्यातील बहुतांश …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर बस
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आवाहन, ‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करा सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून करून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. एस.टी …
Read More »अमोल मातेले यांची सरनाईक यांच्यावर टीका, ते विधान दुर्दैवी आणि अपमानजनक हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाल्याचे विधानावरून केली टीका
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” असे विधान करून केवळ मराठी भाषेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अपमान केला आहे. हे विधान निषेधार्ह, दिशाभूल करणारे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आदेश, नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडे तत्वावर घेण्याबाबत करार
प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून ५१५० ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्याचे ” पार्किंग ” धोरण लवकर आणणार वाहतुक कोंडीच्या समस्येवर उपाय
वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये(MMRDA) करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ” स्मार्ट बस ” येणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीची स्मार्ट बस
भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ” स्मार्ट बसेस ” घेण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. नव्या ३ हजार बसेस खरेदी च्या अनुषंगाने बोलावलेल्या बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार परिवहन विभागाकडून प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, स्कूल बस नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार स्कूल बसबाबतची नवी नियमावली महिन्याभरात लागू करणार
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन …
Read More »
Marathi e-Batmya