दादर येथील डॉ.आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, वंचित बहुजन …
Read More »भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांना केली विनंती राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा राजभवनाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती
तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीबरोबर संघर्षाच्या भूमिकेवर, तर कधी महाराष्ट्राची दैवत आणि महापुरूषांच्या विरोधात वक्तव्ये आणि राज्यातील सत्तांतरा दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेप्रश्नी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिका संशयास्पद राहिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याच्या प्रश्नी मुंबईत महामोर्चाही काढला. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर …
Read More »आंबेडकर-ठाकरे युतीवर शरद पवारांचे मोठे विधान सोमवारी वंचित आणि शिवसेना युतीची अधिकृत घोषणा
एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास …
Read More »बाळासाहेबांच्या जयंतीदिनीच उध्दव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपुष्टात, पुढे काय? अनिल परब यांनी दिली माहिती
शिवसेना कोणाची या मुद्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सध्या कायदेशीर आणि केंद्रीय निवडणूक आयोगात संघर्ष सुरु आहे. त्यातच २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच विद्यमान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पदाची मुदत संपुष्टात येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी केली होती. परंतु …
Read More »वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणार नाही ठाकरे गटाशी आमची बोलणी सुरु आहे त्याबाबत उध्दव ठाकरे घोषणा करतील
स्व.प्रबोधनकारक ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घालत युतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत प्रकाश आंबेडकर यांनीही ठाकरे गटाशी युती करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वंचित आणि …
Read More »निवडणूक आयोगः ठाकरे-शिंदेच्या युक्तीवादानंतर ३० जानेवारीला पुढील सुनावणी सोमवारी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश
शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे यावरून कायदेशीर लढाई शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु आहे. तसेच सध्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी सुनावणीच्या दिवशी ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांचा युक्तीवाद झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि …
Read More »ठाकरे गटाचे वकील म्हणाले, शिंदे गटाचा वाद म्हणजे लोकशाहीची थट्टा आयोगासमोर युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून निवडणूक आयोगात पोहोचलेला वादावर १७ जानेवारीनंतर आज २० जानेवारी रोजी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आज युक्तीवाद केला. या आधीच्या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असल्याचे सांगत पुढील तारखेची मागणी केली होती. त्यानुसार आज कपिल सिब्बल यांनी …
Read More »संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यावर म्हणाले, डरो मत हा आमचा… यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना मारली मिठी
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचताच त्यावेळी तीन महिन्यापासून तुरुंगात असलेले उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होत ते तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत …
Read More »प्रविण दरेकर यांचा आरोप, ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण
उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »निवडणूक आयोगः ठाकरे गटाने युक्तीवादावेळी शिंदे गटाच्या नियुक्त्यांवर घेतला आक्षेप २० जानेवारीला पुन्हा होणार सुनावणी
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने …
Read More »
Marathi e-Batmya