Tag Archives: uddhav thackeray

प्रेतयात्रा काढण्यावरून सुषमा अंधारे म्हणाल्या, मी एकाही राजकिय पक्षाची क्षमा…. आळंदीत प्रतिकात्मक काढली प्रेतयात्रा

शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती …

Read More »

उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका, दिलेलं स्क्रिप्ट फक्त बोलतात.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक उत्तर द्यावं

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेना प्रत्युत्तर, मीच केलय…अरे नाही बाबा समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनानंतर ठाकरे यांनी केली शिंदेवर टीका

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणतीच भूमिका मांडत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही बसवरा बोम्मईंनी …

Read More »

समृध्दीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न.. उध्दव ठाकरे यांचे नाव घेता केली टीका

नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी एक्सप्रेस वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत सूचक विधान केले. त्यामुळे समृध्दी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जमिन दे‌ऊ दिली नसल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान, …मग खुशाल तुम्ही महामार्गाचे उद्घाटन करा पालकासारखे बोला नाहीतर पालकाची भाजी समजून बोलू नका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचं मत ट्रॅव्हल एजन्सीसारखं… घनसावंगी येथील साहित्य समेंलनाचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोलाही लगावला. …

Read More »

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवरील कारवाईप्रश्नी ईडी विरोधात याचिका अँड. नितीन सातपुते यांनी दाखल केली याचिका

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने नोटीसा पाठविल्या. मात्र ज्यांना नोटीसा पाठविल्या त्या आमदार-खासदारांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर या ईडीने काय कारवाई केली? की या सर्वांनी भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून पुढची कारवाई …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा टोला, आता कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवणार का? गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून एकाबाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा सातत्याने अवमान केला जात आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील उद्योग पळवून नेले जात असताना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जात आहे. या घडामोडींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार …

Read More »

सीमावादावर भाजपा म्हणते, सत्तेत असताना शांत बसणा-यांना कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून भाजपाचा ठाकरेंना सवाल

जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री …

Read More »