Tag Archives: uddhav thackeray

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी मला……. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर करून दिली आपल्या भावनांना वाट

मुंबई : प्रतिनिधी केंद्रात मंत्री पदाचा भार दिड महिना सांभाळल्यानंतर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आलेले मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत भावूक झाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला असाच आणखी यश मिळव म्हणून आर्शिवाद दिला असता आणि डोक्यावर हात ठेवला …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आज भेटलो पुन्हा मुंबईत भेटणार कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

कोल्हापूर : प्रतिनिधी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. मी इथे आलो …

Read More »

शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या शिक्षण धोरणा संबंधित वारंवार कानउघडणी करून सुद्धा त्याकडे सपशेल कानाडोळा करीत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडत राज्याची शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. राज्य सरकारने तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणीही त्यांनी …

Read More »

दाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या अनुषंगाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारल्यास संबधित शाळेच्या विरोधात, मुख्याध्यापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारने सर्व खाजगी, अनुदानित, महानगरपालिका, नगरपालिका शाळांना आज एका शासन निर्णयान्वये दिले. एखाद्या ९ वी किंवा १० वीतील विद्यार्थ्याने …

Read More »

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. केंद्र सरकारने १ …

Read More »

शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेत्यांसह या गटातील व्यक्तींना आर्थिक मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटकही प्रभावित होणार असल्याने त्यांच्यासाठीही पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित न्याय द्यावा, …

Read More »

अघोषित लॉकडाऊनबाबत चर्चा करून पुन्हा नव्याने निर्णय घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी असून, या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात …

Read More »

राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून ८० लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, देशमुख यांचा मुद्दा महत्वाचा नाही तर स्फोटकांच्या गाडीचा मुख्य विषयावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा मुद्दा

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा असून अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नसल्याचे वक्तव्य करत मुळ विषयावरून भरकटवू नका असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. सद्यपरिस्थितील लॉकडाऊन लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

कोरोना : ५७ हजारापार- २१ शहरांमध्ये किमान ५०० ते हजाराहून अधिक रूग्ण ५७ हजार ७४ नवे बाधित, २७ हजार ५०८ बरे झाले तर २२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी काल शनिवारी मुंबईत ९ हजारावर असलेल्या संख्येत तब्बल दोन हजाराने वाढ होत आज ११ हजार २०६ रूग्ण आढळले. तर राज्यातील २१ शहरांमध्ये किमान ५०० रूग्णांपासून ३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्येत शनिवारच्या तुलनेत एकदम ८ हजाराने वाढ झाल्याने थेट ५७ हजार ७४ वर …

Read More »