हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज १८ तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तर १९ जुलै रोजी या तिन्ही जिल्ह्यासाठी आणि पुढील दोन दिवसांसाठी ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय मुंबई, पालघर आणि रायगडसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

तर रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र इतर तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिले तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र २१ तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, आदी जिल्ह्याना २० आणि २१ जुलै रोजी यलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला सलग तीन दिवसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला १९ ते २१ जुलै दरम्यान यलो अलर्ट, साताऱ्याला २१ जुलै रोजी, संभाजी नगरलाही २० आणि २१ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यालाही १९ आणि २१ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच परभणी जिल्ह्यालाही १९ आणि २१ जुलै, बीडला २० आणि २१ जुलै रोजी, नांदेड जिल्ह्यालाही १९, २० जुलै रोजी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना २० जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांना १९ ते २१ जुलै असे तीनही दिवस यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा दिलेले हे जिल्हेः

About Editor

Check Also

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचे अवकाशवीर एकाच मंचावर राकेश शर्मा–शुभांशु शुक्ला यांची उपस्थिती; सचिन तेंडुलकर करणार गौरव

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *