राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या ९ तारखेला विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली.

विधिमंडळाच्या सांसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी रोजी सुरु झाल्यानंतर २८ मार्च रोजी पर्यंत सुरु राहणार असून जवळपास १ महिना हे अधिवेशन चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पिय अधिवेशन होत असून जीएसटी कराची अंमलबजावणी सुरु होवून ८ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे या करप्रणालीमुळे राज्याच्या तिजोरीत किती निधी जमा झाला ? याची माहिती राज्याच्या जनतेला कळणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी किती निधी उपलब्ध होणार याचीही माहिती उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर यंदाच्या अधिवेशनात शेतकरी धर्मा पाटील यांचे आत्महत्येचे प्रकरण आणि मंत्रालयात येवून जनतेकडून करण्यात येत असलेली आंदोलने यापार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पिय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून रूग्णालयाची उभारणी

पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *