समीर वानखेडे आणि पत्नी क्रांती यांची गुगल, फेसबुक आणि ट्विटर विरोधात धाव दिंडोशी कोर्टात दाखल केली याचिका

मराठी ई-बातम्या टीम
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी त्यांच्या विरोधात प्रसारीत होणाऱ्या बदनामीकारक वृत्तांना आणि कॉंमेंटना रोखण्यासाठी थेट गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक प्रसार माध्यमांना अटकाव करावा यासाठी दिंडोशी न्यायालयात धाव धेत एक सिव्हील सुट आज दाखल केला.
जवळपास मागील एक महिन्याहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून आणि समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीवरून आरोप करत आहेत. मलिक यांनी केलेले आरोप समाज माध्यमातील गुगल, ट्विटर आणि फेसबुकवर प्रसारीत होत आहेत. तसेच सदरचे आरोप हे खोटे आणि बदनामीकारक असल्याने या सर्व रोखण्यासाठी या तिन्ही सामाजिक माध्यमांवरील अशा प्रकराचा गोष्टी रोखाव्यात अशी मागणी या सिव्हील सूटच्या माध्यमातून वानखेडे पती-पत्नीने केली.
त्याचबरोबर जो कोणी वानखेडे यांच्या विरोधात खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रसारीत करेल त्या वृत्तास या तिन्ही समाजमाध्यमांनी तातडीने ब्लॉक करावे अशी मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. वानखेडे पती-पत्नीच्यावतीने रेक्स लिगॅलिस् या फर्मकडून यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
समीर वानखेडे यांची मुंबईत पोस्टींग झाल्यापासून वानखेडे यांचा सातत्याने फिल्म जगतातील लोकांशी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क येत आहे. तरीही काहीजणांकडून मुख्य प्रसार माध्यमाकडून आणि तिन्ही समाज माध्यमातून बदनामीकारक वृत्त प्रसारीत कऱण्यात येत असल्याचा दावा समीर वानखेडे यांच्यावतीने याचिकेत करण्यात आला आहे.
तर त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी अनेक न्युज चॅनलकडून अनिर्बंधप्रमाणात समाज माध्यमातून आमच्या प्रतिवादीकडून पुरविण्यात येत असलेल्या बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारीत करत आहेत.
समीर वानखेडे यांच्याकडून ज्यांच्या विरोधात तपास कऱण्यात येत आहेत, त्यांना त्याचा त्रास होत असल्यानेच त्यांच्याकडूनच अशा पध्दतीचे खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. या अशा पध्दतीच्या गोष्टींना रोखण्यासाठी समाजमाध्यमांची यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाने या गोष्टींना रोखण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४x७ ‘अलर्ट मोड’वर राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा

मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *