संजय राऊतांच्या आरोपावर नवाब मलिक म्हणाले की, आता लवकरच ते… ईडीने तक्रार केली नाही तर आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होवू शकते

मराठी ई-बातम्या टीम

काल दोन दिवसांपासून राज्यात उस्तुकतेचा विषय ठरलेली शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना राऊत यांनी किरीट सोमय्या यांची कंपनी आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्या झालेल्या व्यवहाराची माहिती आणि महाआयटीत झालेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची माहिती उघडकीस आणली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, मला वाटतं की हे विषय ते आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविणार आहेत. ज्या पध्दतीने हरियाणा कनेक्शन सगळं त्यांनी काढलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षत काय २५ वर्षे चालणार असल्याचे भाकित केले.

आज ज्या प्रकारे संजय राऊत यांनी मागील सरकारमध्ये आयटी विभागात काय घोटाळे झालेले आहेत, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. याचबरोबर किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांचा उल्लेखही केलेला आहे आणि बरेच काही विषय त्यांनी समोर आणले आहेत. मला वाटतं निश्चितपणे हे विषय ते आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवणार आहेत. या संदर्भात अधिक चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी स्वत: माहिती दिलेली आहे. मला वाटतं ज्या पद्धतीने हरियाणा कनेक्शन सगळं त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे आम्ही अगोदरपासूनच बोलत होतो की, सर्वात जास्त घोटाळा कुठे झाला असेल तर इन्कम टॅक्स विभागात आहे. आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं आणखी पुढे ते सगळे विषय, कागदपत्र ते लोकासमोर ठेवतील असे ते म्हणाले.

तक्रारींची दखल जर ईडी घेत नसेल मग आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील तक्रार होऊ शकते. आता पुढे कसं काय होणार आहे, कागदपत्र त्यांनी अजून कोणासमोर ठेवलेले नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही सुरूवात करतोय, हळूहळू सर्व विषय समोर आणू मला वाटतं की पुढील पत्रकार परिषदेत ते कागदपत्रं लोकासमोर ठेवतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या देशात तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडणे, आमदार फोडणे, आमदार खरेदी करणे हे सगळं उघड झालेले आहे. काही लोक बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात गेले होते, त्यानंतर ते पुन्हा परत आले. त्यांनी भाजपमधील काय परिस्थिती आहे, ती सगळी समोर मांडली. या राज्यात देखील यंत्रणेचा दुरुपयोग होतोय हे स्पष्ट आहे. परंतु जास्त दिवस यंत्रणांचा गैरवपार चालू शकणार नाही. महाराष्ट्रात त्यांनी नाव घेऊन कोणत्या नेत्याला कोण त्रास देतय, कोणती यंत्रणा त्रास देतेय ही माहिती लोकासमोर ठेवलेली आहे. मला वाटतंय जबाबदारीपूर्वक त्यांनी हे सगळे आरोप लावलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण वारकऱ्यांसोबत पंगतीला बसून घेतले जेवण

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *