कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन वेळा लाट येवून गेली आहे. मात्र हा विषाणू काही केल्या जायला तयार नाही. मात्र या विषाणूपासून बचाव करून घेण्यासाठी विविध लसी बाजारात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रभावी म्हणून ओळखली जाणाऱ्या कोविशिल्ड या लसीच्या दोन लसीतील अंतर कमी करण्याची शिफारस आता एनटीएजीआयने केली आहे.

यापूर्वी याच एमटीएजीआयच्या शिफारसीवरून कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर वाढण्यात आले होते. पूर्वी पहिला डोस घेतल्यानंतर ८६ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याचे अंतर निश्चित करण्यात आले होते. मात्र या अंतरात आता कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

भारतात बहुतांश लोकांना कोवॅक्सिन, कोविशिल्ड तसंच स्पुटनिक या लसी देण्यात आल्या. मात्र आता कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. NTAGI ने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयने हा सल्ला दिल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास कोरोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर दिला जातो. आतापर्यंत देशातील सात कोटी जनतेने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.

About Editor

Check Also

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *