चंदिगड दिब्रुगड एक्सप्रेसचे डबे रूळावरून घसरलेः चार जण मृत तर ३० जण जखमी उत्तर प्रदेशात गोंडा जवळ घडला अपघात

मागील काही दिवसांपासून सातत्याने रेल्वे गाड्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. आसाम आणि दार्जिलिंग जवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटना अद्याप ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील गोंडाजवळ आज चंदिगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात किमान चार प्रवासी ठार तर ३० हून अधिक प्रवाशी जखमी झाले, असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र अपघाताचे नेमके कारण कळाले नसले तरी कारणाचा शोध घेतला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहितीत म्हटले आहे की, अपघातापूर्वी ट्रेनच्या लोको पायलटने मोठा स्फोट ऐकला. अपघातामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या असून ११ गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला मृतांच्या संख्येवरून संभ्रम होता. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, चार जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हा दंडाधिकारी नेहा शर्मा यांनीही मीडियाला समान संख्या दिली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने मात्र दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

खराब हवामानामुळे काही काळ बचाव कार्यावर परिणाम झाला, पण पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (SDRF) काही तासांत हे काम पूर्ण केले. संध्याकाळी, यूपीचे मदत आयुक्त जीएस नवीन म्हणाले की ऑपरेशन संपले आहे आणि डब्यांमध्ये कोणीही अडकले नाही. फक्त ट्रॅक साफ करणे बाकी होते.

४० सदस्यीय वैद्यकीय पथक आणि १५ रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत आणि अधिक वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका तेथे रवाना केल्या जात आहेत, असे उत्तर प्रदेशचे मदत आयुक्त जीएस नवीन कुमार यांनी सांगितले.

उत्तर-पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक सौम्या माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरल्याने किमान दोन प्रवासी ठार झाले आणि ३० हून अधिक जखमी झाले.

सुरुवातीला मृतांच्या संख्येवरून संभ्रम होता. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, चार जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हा दंडाधिकारी नेहा शर्मा यांनीही मीडियाला समान संख्या दिली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने मात्र दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात १८ जुलै रोजी दुपारी चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले, यात किमान दोन जण ठार आणि ३० हून अधिक जखमी झाले. अपघाताचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत स्थानिक प्रशासनाला बाधित प्रवाशांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची मुंबईत भेट भारत-फ्रान्स व्यावसायिक संबध वृद्धींगत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१६ फेब्रुवारी २०२६) मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *