मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांच्या त्या आरोपावर म्हणाले, माझ्यासाठी धक्कादायक पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आणि इतर नेत्यांमध्ये आता चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे मनोज जरांगेच्या भूमिकेवरून रोज एका नेत्याकडून विविध पातळीवर भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस असा सामना रंगविण्यात येत असल्याचा दावा केल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर यानी केलेल्या आरोपावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणले की, मराठा समाज मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. मात्र मराठा समाजानं मोठं व्हाव असे इतर नेत्यांना वाटत नाही. बच्चू कडू यांनी मला ऑफर दिली असून त्याबाबत २९ ऑगस्टच्या समाजाच्या बैठकीत पुढील निर्णय होईल असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांनी केलेले आरोप माझ्यासाठी धक्कादायक होते अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप धक्कादायक असून मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भांडण नकली असल्याचं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप केला होतो. हे आरोप धक्कादायक असून प्रकाश आंबेडकर यांनी अशा आशयाचे आरोप केलेत यावर माझा विश्वासच बसत नाही.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही असे स्पष्ट केले. यावर पंकजा मुंडे यांनी यावर मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासबद्दल धन्यवाद असे सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला आरक्षणाच्या अनुषंगाने दिलेली अल्टीमेटमची मुदत संपली असून आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे मराठा समाजासह ओबीसी समाजाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची माहिती, मुख्य सचिवांचे पोलिसांना आदेश, वाहने अडवणाऱ्यावर कारवाई करा आमदार रईस शेख, अबू आझमी, अस्लम शेख, सना मलिक यांची बैठकीला उपस्थिती

२८ मे रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहने अडवणाऱ्या स्थानिक गुंडांवर कठोर कायदेशीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *