Breaking News

यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार शिवाजी साटम, तर राज कपूर पुरस्कार आशा पारेख यांना जाहिर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली पुरस्काराची घोषणा

यंदाचा २०२३ सालचा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने देण्यात येणारा स्व. व्ही शांताराम आणि स्व. राज कपूर यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार या हिंदी-मराठी चित्रपटासृष्टीतील अभिनेते शिवाजी साटम यांना आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एक्स या ट्विटरवर एका पोस्टच्या माध्यमातून जाहिर केला.

यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

तसेच सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना देण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी या कलाकारांना पुरस्कार जाहिर केल्यानंतर या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन करत चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.

Check Also

कल्की 2898 एडी चित्रपटावर सुपरस्टार रजनीकांत खुषः दोन दिवसात २८९ कोटी रूपयांची कमाई दिग्ददर्शक नाग अश्विनने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याची प्रतिक्रिया

समाज माध्यमांवर एक छोटासा जीआयएफ पध्दतीचा ट्रेलर रिलीज करत कल्की 2898 एडी इतकेच नाव पुढे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *