विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुमारंभ करत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचारसभा आज बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडली. या विधानसभा निवडणूकीला नजरेसमोर ठेवत राज्यातील जनतेसाठी पाच वचनांची गॅरंटी यावेळी जाहिर करण्यात आली. यातील पहिल्या गॅरंटीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील महिलांना महाराष्ट्रात कोठेही प्रवास मोफत करण्यात येणार आहे. तसेच महिलांना दर महिन्याला ३ हजार रूपये देणार असल्याची घोषणा करत पहिी गॅरंटी जाहिर केली.
यावेळी झालेल्या जाहिरसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी-इंडिया आघाडीकडून आम्ही पाच वचनं जाहिर करत आहोत. ज्या ही राज्यात काँग्रेस शासित सरकार आली. ती सरकारकडून तेथील जनतेला देण्यात आलेली वचन पाळण्यात येत असून या गॅरंटी अद्यापही सुरु असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी जेव्हा ही माझ्या हातातील पुस्तक (राज्यघटनेचे पुस्तक) दाखवतो. त्यावेळी भाजपामध्ये राज्यघटना कोण बदलतयं. पण राज्यघटना बदलण्यासाठी आरएसएस हे लपून प्रयत्न करत आहे. त्यांना माहित आहे की राज्यघटना बदलण्यासाठी जर सरळ गेले तर संपूर्ण देश त्यांच्यापुढे उभा राहिल. त्यामुळेच राज्यघटनेवर लपून हल्ले करत असल्याच्य़ा आरोपाचा पुर्नरूच्चार केला.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या हातातील हे पुस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना नसून यात डॉ आंबेडकरांचे विचार, बसवअण्णाचे विचार, भगवान बुद्धाचे विचार, फुले यांचे विचार या सर्वांचे विचार आहेत. त्याचबरोबर येथील तरुणांचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क, प्रत्येक दिन दलितांचे हक्क या पुस्तकात आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचविणे महत्वाचे असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे बोलायला उभे राहिले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील परिस्थिती जर पाहिली तर खुपचं दयनीय असल्याचे दिसून येते. राज्यातील भाजपाप्रणित महायुतीच्या सरकारने सगळे उद्योग कारभार गुजरातला हलविण्याचे काम सुरु आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात अतुलनीय कामगिरी बजाविणारं सरकार आहे. परंतु या राज्याची परिस्थिती कठीण करून ठेवण्याचा आरोपही महायुती सरकारवर केला.
यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणना करण्यात येणार असून जी ५० टक्क्याची भिंत आहे ती पाडणार असल्याचेही यावेळी सांगितले.
राज्यात कृषी समृद्ध योजना राबविणारः-शरद पवार
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील ६४ हजार युवती आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून लक्ष हटवून त्यांना १५ रूपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र बेपत्ता महिलांच्या बाबत हे सरकार काहीच बोलायला तयार नसल्याची टीकाही यावेळी केली.
यावेळी शेतकऱ्यांसाठीची कृषी समृद्धी योजना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी करत राज्यातील शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज महाविकास आघाडीकडून माफ करण्यात येणार असल्याची घोषणा करत जे शेतकरी नियमित कर्ज हप्ते फेडत आहेत, त्यांना ५० हजार रूपयांची सबसिडी देणार असल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून मुंबई आणि रायगडावर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यांना अद्याप काहीही झाले नाही. ते पुतळे तसेच उभे आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदूर्गात बसविण्यात आलेला पुतळा मात्र वर्षभराच्या आतच कोसळून पडतो. कारण यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचारापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच मोदी यांनी बसविलेला पुतळा आठच महिन्यात कोसळला. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुतळ्यांना अदयाप काही झालं नाही. कारण त्यात भ्रष्टाचार झालेला नसल्याचेही यावेळी सांगितले.
त्याचबरोबर शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या शिक्षणातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याचेही यावेळी सांगत महिलांना संरक्षण देणारं, दिन-दलितांना सुखा समाधानानं जगता येणारं सरकार देणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.
Marathi e-Batmya