उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, देवाभाऊ जिकडे जाऊ तिकडं खाऊ महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत तरूणासाठी केली घोषणा

महाविकास आघाडीच्या झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी, शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी गॅरंटी जाहिर केली. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कर्नाटक, तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आलेल्या गॅरंटी कायम देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी मविआच्या वतीने महिला आणि शेतकऱ्यांसाठी गॅरंटी देण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी दोन मोठ्या योजना जाहिर केल्या. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला बेरोजगार तरूणाची व्याख्या लवकरच नव्याने ठरवावी लागणार असून आता लवकरच आणखी एक तरूण बेरोजगार होणार असल्याची खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता करत राज्यातील २३ नोव्हेंबरला आपल्याला विजयाचे सुतळी बाँम्ब फोडायचे असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दिवाळी झालेली आहे. आता निवडणूकीची फटाखे फोडायचं काम सुरु झालेलं आहे. त्यांच्याकडून फुसके फटाके आणि फुलबाज्या उडवायचं काम सुरू आहे. मात्र आपल्याकडे सुतळी बॉम्ब आहे. आपल्य़ाला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. ते २३ नोव्हेंबररोजी विजयाच्या दिवशी फोडायचे असल्याचे सांगत त्यांना काय उडवायचं ते उडवू द्या असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवले होते. पाच जीवनावश्यक वस्तू त्याच गहू, तेल, तांदूळ यासह ज्या पाच वस्तू आहेत. त्या वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. आताही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होऊ देता पाच जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी इतके कर लावले आहेत की, ह्यावर कर लाव त्यावर कर लाव उद्या ते श्वास घ्यायलाही टॅक्स लावतील. पण आम्ही ज्या गोष्टी बोलतो त्याच करून दाखवतो. त्यांच्यासारखे नुसतं बोलून दाखवतो आणि करत काहीच नाही असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, सध्या राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येत आहे. आता मुलांबरोबर मुलांनाही मोफत शिक्षण महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर देणार असून शिक्षण झाल्यावर काय मग बेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत काय असा सवाल करत बेरोजगार तरूणांना दर महिन्याला प्रत्येक बरोजगार तरूणाला ४ हजार रूपये देणार असल्याची घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपाच्या फेक नॅरेटीव्हच्या टीकेवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हमाले की, लोकसभेत जो प्रचार केला, त्यास भाजपाले फेक नॅरेटीव्ह असल्याचा आरोप करत आहेत. मात्र भाजपाला जर आम्ही केलेला प्रचार हा फेक नॅरेटीव्ह जर वाटतं तर धारावीसाठी अदानीला ज्या जमिनी दिल्या त्यासाठी जे काही शासन निर्णय जाहिर केले ते एका क्षणात फेक जीआर ठरू शकतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांना त्यांच्या उद्योगासह घर देणार असल्याचे आश्वासन देत ज्या जमिनी दिल्या, मिठागरांच्या जमिनी दिल्या, सगळं टीडीआर दिलं. ते सर्व सर्व रद्द करू अशी घोषणा करत आता महाविकास आघाडीच्या घोषणेत मुंबई बचाव आणि धारावी बचावचा नाराही समाविष्ट करण्यात आल्याचे यावेळी जाहिर केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईचे मच्छिमार असलेले कोळी वाड्याच्या जमिनीही यांना अदानीच्या, बिल्डरच्या घशात घालायच्या आहेत. त्यामुळे आपल्या कोळीवाडे आणि गावठाणं बिल्डर आणि अदानीच्या घशात जाऊ देणार नाही असा इशारा देत त्यांच्या होड्या काय पार्किंगमध्ये ठेवणार का, त्यांच्या मच्छी काय माळ्यावर, व्हरांड्यात सुकावणार का असा सवाल करत सगळा कारभार गुजरातला हलविण्यात येत आहे. असं पाहुन षंढासारखं जगंण्यापेक्षा मरणं चांगलं अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करता उद्घव ठाकरे म्हणाले की, आमचे देवा भाऊ आणि जिथे जाऊ तेथे खाऊ म्हणणाले बेहरामपाड्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार म्हणून घोषणा करत मुंब्र्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा केली. पण देवा भाऊ मुंब्रात पहिल्यांदा जा प्रवेशद्वारावर शिवाजी महाराज, शाहु महाराज आणि फुले यांचे पुतळे आहेत. आधी ते जाऊन बघा, ज्या आमच्या गद्दाराला घेऊन गेलात आणि डोक्यावर घेऊन बसलात त्याच्या ठाण्यात किती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले हे ही बघा अशी खोचक टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *