पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॅगच्या अहवालाचा देत आम आदमी पक्षावर (आप) फक्त ‘शीश महल’ अर्थात मुख्यमंत्री निवासस्थावर केलेला खर्चावर टीका करत अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी भाजपाचे नाव, आणि काहीतरी ते आप AAP च्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असा आरोप केला.
दिल्लीतील रोहिणी येथील जपानी पार्क येथे भाजपाच्या ‘परिवर्तन’ रॅलीत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज एका मोठ्या वृत्तपत्राने कॅगच्या अहवालावर आधारित ‘शीशमहल’वरील खर्चाविषयी लिहिले आहे.” ते म्हणाले की, जेव्हा देशभरातील लोक कोविड-19 महामारीशी लढत होते, तेव्हा ‘शीशमहल’ बनवण्याचे ‘आप’चे ध्येय होते.
भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालावर आधारित लेखात असे दिसून आले आहे की ७.९१ कोटी रुपयांच्या प्राथमिक अंदाजापासून सुरुवात करून, ६, फ्लॅग स्टाफ रोडच्या जागेचे काम २०२० मध्ये ८.६२ कोटी रुपये देण्यात आले आणि जेव्हा हे सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) २०२२ मध्ये पूर्ण केले, एकूण खर्च ३३.६६ कोटी रुपये होता.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्हाला हे जाणून दुःख होईल की जेव्हा लोक कोविडशी लढत होते, औषधे आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावत होते, तेव्हा त्यांचे (आप) संपूर्ण लक्ष शीशमहाल बनवण्यावर होते. त्यांनी शीश महालासाठी भरीव बजेट तयार केले. वृत्तपत्राने दाखवून दिले आहे की शीशमहलवर तीन वेळा बजेट कसे खर्च केले गेले, असा आरोपही यावेळी केला.
आम आदमी पक्षावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ज्यांनी दिल्लीत आप-दा (आपत्ती) आणली त्यांचा आरोप आहे की केंद्र त्यांना काम करू देत नाही आणि केंद्र त्यांना पैसे देत नाही. त्यांचा शीशमहाल त्यांचे खोटेपणा सिद्ध करतो… हे त्यांचे वास्तव आहे. त्यांना दिल्लीच्या जनतेची किंवा विकासाची पर्वा नाही. म्हणूनच लोक म्हणत आहेत, ‘आप-दा नही देखेंगे, बदल के रहेंगे (आम्ही आपत्ती सहन करणार नाही, आम्ही बदल घडवून आणू)’, असा इशाराही यावेळी दिला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधीच पंतप्रधान मोदींनी आप वरील टीकेला सुरुवात करत मोफत वीज, पाणी आणि महिलांसाठी वाहतूक यासारख्या चालू असलेल्या कल्याणकारी योजना भाजप सत्तेवर आल्यावर आणि सरकार स्थापन केल्यानंतरही दिल्लीत सुरूच राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ये लोग अपने हार सामने देख रहे हैं (हे लोक इतके घाबरले आहेत कारण ते आगामी निवडणुकीत आपला पराभव पाहत आहेत) त्यामुळेच भाजपची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या सर्व कल्याणकारी योजना बंद केल्या जातील असे खोटे बोलत आहेत. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो आणि खात्री देतो की दिल्लीत सध्या सुरू असलेल्या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहतील. पर बैमानों का जो थेका है उससे हटाया जायेगा (परंतु आम्ही बेईमान लोकांचा ठेका काढून टाकू)… आम्ही या आप-दा लोकांना हटवू, प्रामाणिक नेते आणू आणि सर्व कल्याणकारी योजना पुढे करू, असे आश्वासनही यावेळी दिले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या आप सरकारवर शहरातील खराब पायाभूत सुविधा आणि विकासाचा अभाव असल्याची टीका मोदींनी केली. “भाजपा सरकारने दिल्लीत १,००० हून अधिक इलेक्ट्रिक बस सुरू केल्या आहेत आणि ई-मोबिलिटी वेगाने पुढे जात आहे. याउलट, आप सरकारने शहरातील सार्वजनिक वाहतुकीला पाठिंबा देण्यासाठी फारसे काही केले नाही. ते बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडतात, वारंवार ट्रॅफिक जाम होतो आणि शहराभोवती कचरा पसरतो,” असा आरोपही केला.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “मी या लोकांना उघड करायला सुरुवात केल्यापासून ते घाबरले आहेत. या लोकांनी १० वर्षे दिल्लीला गरीब अवस्थेत ठेवले आणि आज लोक त्यांना आप-दा म्हणतात. ते माझ्यावर हल्ला करतात. पण त्यांनी दिल्लीचे काय वळण लावले ते पहा. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो; पावसात पाणी साचते; हिवाळ्यात, प्रदूषित हवेत श्वास घेणे कठीण असते. प्रत्येक सीझन हा आप-दा काल असतो, अशी टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीतील लोकांची ऊर्जा ‘आपडा’ला सामोरे जाण्यात खर्ची पडते, असे सांगून मोदी म्हणाले, “आप-दा सरकार हटवल्यावरच दिल्लीचा विकास होईल… दुहेरी इंजिन सरकार आणि सुशासन जेव्हा येथे पोहोचेल तेव्हाच विकास दिसेल.”
शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आप-दा गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुविधा कशा थांबवते हे दिल्लीच्या लोकांना जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. आप सरकार पंतप्रधान आवास योजनेची योग्य अंमलबजावणी करत नाही; त्यामुळे गरिबांसाठी घरे बांधण्यात अडथळे निर्माण होत आहेत. गरिबांसाठी बांधलेली ३० हजार घरे रिकामी आहेत. भाजपाने शेकडो अनधिकृत वसाहती नियमित केल्या, पण आपडा सरकार तेथे पाणी आणि गटारांच्या लाईनची व्यवस्था करत नाही, असा आरोपही यावेळी केला.
Marathi e-Batmya