मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले अशी टीका केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सुरेश धस संतोष देशमुख यांच्या हत्येमागील लोकांविरुद्ध आवाज उठवत होते. त्यांनी त्या लोकांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली. आता त्यांनी त्या लोकांचे चेहरे पाहिले आहेत. ते एका क्रूर माणसाला कसे भेटू शकतात? असा सवाल करत ज्याचे सहकारी संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी जबाबदार आहेत अशा माणसाला ते कसे भेटू शकतात? आता, मराठा समाजाने कोणाकडून न्याय मागायचा? असा सवालही यावेळी अंतरवली-सराटी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी मराठा समाजाकडून कौतुक मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर ते राजकारण खेळत आहेत… जर त्यांना मराठा समाजाकडून सन्मान हवा असेल तर त्यांनी शेवटपर्यंत समाजासाठी लढायला हवे होते, अशी खोचक टीकाही यावेळी केली.

शुक्रवारी धनंजय मुंडे यांचे कट्टर टीकाकार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची दोनदा भेट घेतली. एकदा, ते पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी मुंडे यांची भेट घेतली होती. दुसरी भेट मुंबईतील मुंडे यांच्या निवासस्थानी झाली.
सुरेश धस आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघांनीही बैठका झाल्याची पुष्टी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेली बैठक चार तासांपेक्षा जास्त काळ चालली.

बैठकीबद्दल विचारले असता सुरेश धस म्हणाले, मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी गेलो, कारण त्यांनी मला जेवणासाठी आमंत्रित केले होते. मुंडेही आले होते. बावनकुळे यांनी आम्हाला आमचे मतभेद मिटवण्यास सांगितले. तथापि, मी देशमुखांच्या मुद्द्यावर बोलणार नाही असे सांगितले. मी त्यांना सांगितले की देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढत राहीन.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, मुंडे यांच्यावरील विरोधातील लढ्यात सुरेश धस आघाडीवर होते आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना या गुन्ह्यासाठी जबाबदार धरले होते. सुरेश धस आणि इतर राजकीय नेत्यांनी मुंडेंवर टीका केली होती की ते या प्रकरणात त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवत आहेत. या प्रकरणात मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *