वर्षा गायकवाड म्हणाल्या, उत्तर भारतीय समाजाला जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान उत्तर भारतीयांच्या विकासात काँग्रेसचे योगदान

उत्तर भारतीय समाज, मुंबई व काँग्रेस पक्ष यांचे एक घट्ट नाते आहे. मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आजही काही लोक उत्तर भारतीयांविरोध आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम केले जाणार आहे, त्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान सुरु करण्यात येत असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

उत्तर भारतीय सेलच्या वतीने सुरु करण्यात येत असलेल्या या अभियानाची माहिती देताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई शहरातील विविध भागात कार्यक्रम आयोजित करून, उत्तर भारतीय समुदायाची प्रसिद्ध ठिकाणे, मुंबईतील काँग्रेस पक्षाशी असलेले उत्तर भारतीयांचे नाते आणि या समाजाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या योगदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी यासाठी हे अभियान सुरु करण्यात येत आहे. उत्तर भारतीय सेल प्रत्येक जिल्ह्यात आणि नंतर प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करेल, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करणे हे आहे.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांना मुंबई विविध पदे दिली आहेत. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री अशा पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. काही लोकांनी त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेतला व समाजाला मात्र विकासापासून वंचित ठेवले. काँग्रेस पक्ष उत्तर भारतीय समाजाच्या प्रमुख समस्यांसाठी, मग ते रेल्वे असो किंवा फेरीवाल्यांचे, मोठ्या प्रमाणात चळवळ आणि आंदोलनाच्या माध्यमातून काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवनिश सिंह, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस, डॉ सतेंद्र, माजी नगरसेवक बब्बू खान, कचरू यादव, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, रत्नेश सिंह, प्रदीप चौबे आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *