सीएए आमच्या अखत्यारीत नसताना आम्ही का राबवावा ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी

सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले.

एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने व आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे.

एनपीआरसाठी सेन्सेस २०१० मध्ये झाला, त्यावेळी प्रश्नावली तयार झाली होती. मात्र जे प्रश्न तयार झाले ते आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे लोक याबाबत एकत्र बसतील. अमित शहांना अपेक्षित आहे ते आम्ही लागू करु देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *