मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे  यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देण्याचं जाहीर केलं आहे.

कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदशानाखाली एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कृषी विभाग गट अ ते ड श्रेणी मध्ये कार्यरत असलेल्या एकूण २३९५९ अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांचे मिळून एकत्रित सहा कोटी सतरा लाख, पन्नास हजार (६,१७,५०,०००) रुपये हुन अधिक रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीत जमा होणार आहे.

पुढे बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, कृषी विभागासह राज्यातील चार कृषी विदयापीठे, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी विभागाची महामंडळे आणि इतर प्रकल्प यांनी ही एक दिवसाचे वेतन देण्याचे कबूल केलं आहे. तसेच कृषी मंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांचे एक दिवसाचे  वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेवटी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, तसेच महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना यांच्यासह राज्यातील इतर ही कृषी अधिकारी व कर्मचारी संघटनांनी वेतन देण्यासंदर्भात पत्र दिले असल्याचे सांगत या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्यासाठी मदत होणार असून आज शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात ‘कृषी परिवार’ खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून, मानवीय दृष्टिकोनातूनही साथ देऊ शकते याचा उत्तम आदर्श विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घालून दिला आहे. तसेच शासनाने २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून उर्वरित जिल्ह्यांना पंचनामे पूर्ण होतील त्याप्रमाणे मदत दिवाळी पूर्वी दिली जाईल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला दिल्या शुभेच्छा

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *