कृषी

वेगळेपण दिसण्यासाठी बदल करण्याऐवजी केंद्राचा कृषी कायदा आहे तसा लागू करा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीचे स्वातंत्र्य देण्यासाठी केलेल्या कृषी कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात राज्य सरकारने मांडलेली कृषी विधेयके म्हणजे केंद्राच्या कायद्यातील किरकोळ बदल आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असून …

Read More »

पीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा मिळणार असल्याचे असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री पाटील …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या  हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी वर्गास देत राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. …

Read More »

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट

मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने ठाम भूमिका मांडावी यासाठी आज शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून विविध संघटनांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार …

Read More »

ऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी लागू करण्यात आलेल्या एफआरपी कायद्याच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी कायदा आणणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देत कायद्याची निर्मिती झाल्यानंतर दुधाला हमी भाव देण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात …

Read More »

१ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहिम १ जुलैपर्यंत सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी १ …

Read More »

फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि …

Read More »

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी शेती मालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते बाजारात येऊ नये यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचा निकाल विहित कालावधीत देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांच्या कामाचा आढावा कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या …

Read More »

नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ …

Read More »

शरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.  …

Read More »