कृषी

शासन साखर उत्पादकांची पाठिशी एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पुणे : प्रतिनिधी साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ऊसाच्या हार्व्हेस्टरसाठी राज्य शासनाने ४० लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी …

Read More »

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्या शिवसेनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. मध्य प्रदेश सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल  ८०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर राज्यातही भावांतर योजना लागू करावी अशी मागणी …

Read More »

दुष्काळामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असला तरी राज्यातल्या जनतेला कमतरता भासणार नसल्याचा दिलासा सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर जे कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिला नाही अशा ११ कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणीही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना करणार त्यांनी …

Read More »

शेतकऱ्यांनो बोगस औषध कंपन्यापासून सावधान नुकसान झाल्यास थेट ग्राहक मंचाकडे धाव घ्याः अभ्यासक अभिजित झांबरे यांचा माहितीपर लेख

परवा तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावचे द्राक्षउत्पादक शेतकरी हिम्मत भोसले यांचा फोन आला. त्यांनी आपल्या द्राक्षबागेला पेस्ट लावण्यासाठी एका कंपनीचे औषध आणले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे औषध वापरुन तयार होणाऱ्या पेस्टचे मिश्रण फाटत होते. त्यामुळे औषध वाया जाऊन आणि पेस्ट लावणीसाठी आलेले मजूर खोळंबून त्यांचे साधारण दहाऐक हजाराचे आर्थिक नुकसान झाले …

Read More »

डिजीटल सोल्युशन शेतीसाठी वरदान उपराष्ट्रपतींच्या हस्ते तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी हवामान आधारित शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट करतानाच खर्च कमी झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. डिजीटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरू शकते. शाश्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. पवई येथील आयआयटी मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त शेतीसाठी …

Read More »

‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी शेतकरी गटामार्फत ७० एकर क्षेत्रावर उत्पादन

पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील ७० एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या(ओंबी) …

Read More »

२५ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषी पंपाचे वाटप करणार १ लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. साधारणतः ३ वर्षात ही योजना राबविण्यात येणार असून १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण केले जाणार आहे. या योजनेसाठी शासन ३ वर्षात ८५८.७५ …

Read More »

तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय रक्कम तातडीने देण्यात यावी पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी तूर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची देय असलेली रक्कम पणन महासंघाने तातडीने देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिले. हंगाम 2018-19 मधील हमीभावाने मूग, उडिद व सोयाबीनच्या खरेदी संदर्भातील पूर्व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.योगेश म्हसे, वखार …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कवठा गाव गहाण ठेवणार उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावातील गावकऱ्यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्याना आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावच्या गावकऱ्यांनी आपले गावच गहाण ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती सेवाग्राम स्कूल ऑफ नेचर अँण्ड कल्चरचे विनायकराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी …

Read More »

भूजल अधिसूचना राज्यातील शेतकऱ्यांना संकटात नेणारी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, …

Read More »