Editor

मलिक यांच्याबाबत भाजपा ठाम; तर अजित पवार म्हणाले, बोलणं नाही…

राज्यातील २० वर्षे झालेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री तथा आमदार नवाब मलिक यांना काही महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला. त्यानंतर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या समर्थक गटात प्रवेश केला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर …

Read More »

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण …

Read More »

कर्जावरून नाना पटोले यांचा सवाल, पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त भरपूर दिले भरपूर दिले अशा घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर …

Read More »

अजित पवार यांनी मांडल्या भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूरात सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर पुढील काही महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणूका आणि त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या खर्चाचा अंदाज धरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …

Read More »

नाना पटोले यांची आरोप, … स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा …

Read More »

नाचणीचे आहे, आहारात महत्व

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे. मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड …

Read More »

सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…

राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणार

महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, … सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब …

Read More »