दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल …
Read More »पशुसंवर्धनच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक
पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा आकृतिबंध सुधारित करणे आवश्यक असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आकृतिबंधविषयी मंत्रालय …
Read More »महेश तपासेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प जाण्याचा सपाटा…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन सर्वाधिक गुंतवणूकीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला. त्यापाठोपाठ राज्यात येवू घातलेला बल्क ड्रग्ज् पार्क आणि तिसरा टाटाचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. या तिन्ही प्रकल्पावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या प्रकल्प बाहेर पडण्याच्या यादीत आता आणखी एका प्रकल्पाची समावेश झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »भाजपा म्हणते, शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही
एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात …
Read More »पदयात्रेतील शिवसेनेच्या सहभागावर भाजपाची टीका अनावश्यक
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे …
Read More »कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागत
लाल मातीत सजलेल्या कुस्तीच्या आखाड्यात, कसलेल्या मजबूत शरीरयष्टीचे कोल्हापुरी पैलवान अंगाला तेल लावून उभे ठाकले होते. बाजूला उभ्या असलेल्या वस्तादानी हात उंचावून इशारा करताच सलामी झडली, नजरेला नजर भिडली आणि एकच झटपट सुरू झाली. कोणी एकेरी पट काढत तर कोणी समोरच्याचा तोल जोखत कुस्ती लागली. एकमेकांवर तुटून पडले होते…. आणि …
Read More »जितेंद्र आव्हाडांना आधी १४ दिवसांची कोठडी आणि जामीन
साधारण मागील आठवड्यात हर हर महादेव या मराठी चित्रपटात शिवकालीन इतिहासात मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमध्ये जात या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच तेथील एका प्रेक्षकाला मारहाणीचा एक व्हिडिओही प्रसारीत झाला. त्यानंतर आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना काल संध्याकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली. …
Read More »गजानन किर्तीकरांनी ठाकरेंची मशाल सोडत हाती धरली शिंदेंची ढाल तलवार
मागील अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच या अनुषंगाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही किर्तीकर हे उध्दव ठाकरे गट सोडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार आज गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरे गटाची साथ सोडत …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ठणकावलं, हे वर्तन स्विकारण्या योग्य नाही
राज्यघटनाकारांनी घटनेची रचना करताना निकोप लोकशाहीसाठी चार स्वतंत्र यंत्रणांचे अस्तित्व मान्य केले. यातील पहिली यंत्रणा म्हणजे, कायदे मंडळ, त्यानंतर न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमं. परंतु कायदेमंडळ आणि न्यायपालिकांच्या कार्यकक्षा निश्चित कऱण्यात आलेल्या असल्या तरी अधूनमधून या दोन्ही यंत्रणांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाह्यला मिळाले. मात्र केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पहिल्यांदाच सर्वोच्च …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित जागांसाठीही पदभरती प्रक्रिया राबविणार
प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे …
Read More »
Marathi e-Batmya