वसई- विरार मधील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, रक्षाबंधनमुळे एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान १३७.३७ कोटींचे उत्पन्न
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री …
Read More »तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील …
Read More »राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करण्यात येणार
महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब …
Read More »सुप्रिया श्रीनेत यांचे राज्य पक्ष पदाधिकाऱ्यांना आवाहन, सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र
सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्ष सुप्रिया श्रीनेत यांनी केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी …
Read More »अमेरिकेकडून भारतातीय मालावरील टॅरिफ ५५ टक्के आकारले जाते अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची माहीती
७ ऑगस्टपासून अमेरिकेने वस्तूंवर २५% परस्पर कर आकारल्याने भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या एकूण माल निर्यातीच्या सुमारे ५५% भागभांडवल होऊ शकते, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी सांगितले. वाणिज्य विभाग निर्यातदार आणि उद्योगांसह सर्व भागधारकांशी परिस्थितीच्या मूल्यांकनाचा अभिप्राय घेण्यासाठी संपर्कात आहे, असे चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. “उत्पादन …
Read More »ट्रम्प टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी भारताकडून एका समितीची स्थापना पंतप्रधान कार्यालयाकडून समितीची स्थापना
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अपवाद वगळता भारतीय निर्यातीवर एकूण ५०% कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) संभाव्य नुकसान रोखण्यासाठी कृतीत उतरले आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकींच्या मालिकेनंतर, पीएमओने अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाला (डीईए) उत्पादन क्षेत्रासाठी कर आणि निर्यात मंजुरी प्रक्रियांमध्ये सुधारणा …
Read More »नव्या सुधारीत आयकर कायद्यातील वैशिष्टै नेमकी काय आहेत? आज लोकसभेत मंजूर झालेली प्राप्तिकर कायद्यातील तरतूदी पाहू
११ ऑगस्ट रोजी लोकसभेने सुधारित नवीन आयकर विधेयक, २०२५ आणि कर कायदा (सुधारणा) विधेयक, २०२५ मंजूर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुधारित आवृत्ती मांडल्यानंतर लगेचच आयकर (क्रमांक २) विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. विधेयके मंजूर झाल्यानंतर, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विद्यमान १९६१ कायद्याची जागा घेणारे नवीन आयकर विधेयक …
Read More »
Marathi e-Batmya