Breaking News

जेफ्री एपस्टीन महिला-मुलींना कशा पद्धतीने जाळ्यात ओढायचा जवळपास १ हजार मुलांना जाळ्यात ओढले

१४ वर्षीय जेनच्या (अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या फाईल्समध्ये ओळख पटवल्यानुसार) उन्हाळी शिबिरादरम्यान मिशिगनमध्ये आईस्क्रीम खाताना झालेल्या एका लहानशा गप्पांचे रूपांतर तिच्यासाठी अनेक वर्षांच्या अत्याचारात झाले, जेव्हा ब्रिटिश सोशलाइट घिसलेन मॅक्सवेल तिच्या यॉर्कशायर टेरियर कुत्र्यासोबत चालत आली आणि तिने स्वतःची ओळख करून देण्यासाठी थांबली. त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि …

Read More »

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत

मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली …

Read More »

संयुक्त किसान मोर्चाने मागितला पियुष गोयल यांचा राजीनामा भारत- अमेरिका व्यापारी करारावरून केली मागणी

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. सफरचंद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले की, कापसाच्या आयातीला कोणतीही सूट दिल्यास जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांसाठी ते विनाशकारी ठरेल. शनिवारी (७ फेब्रुवारी, …

Read More »

जेफ्री एपस्टीन आणि दलाई लामा यांची भेट? कार्यालयाचा खुलासा जेफ्री एपस्टीनशी कधी भेटच कधी झाली नाही

दलाई लामा यांच्या कार्यालयाने रविवारी माध्यमांच्या काही विभागांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या दाव्यांचे ठामपणे खंडन केले, ज्यात तिबेटी आध्यात्मिक नेत्याला दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी जोडण्याचा प्रयत्न केला जात होता. दलाई लामा यांच्या कार्यालयाने सांगितले की, तिबेटी नेत्याने एपस्टीनला कधीही भेटलेले नाही. ८ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, राजमाता जिजाऊ एसटीच्या नव्या बसेसचे नामकरण नव्या प्रवासी एसटीचे राजमाता जिजाऊ नामकरण

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ‘ हिंदवी स्वराज्याची …

Read More »

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण- वंचितच्या कार्यकर्त्यांची अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारले 'वंचित बहुजन आघाडी'च्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका !

मुंबईत राहुल जाधव या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा आरोपी बिल्डर सुशील रहेजा विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याने खळबळ माजली होती. सुशील …

Read More »

टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये मात्र काही महिला परिक्षार्थींना मात्र वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. परिक्षा केंद्रातील नियम म्हणून त्यांना त्यांच्या गळातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगितल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे …

Read More »

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले, तर जगभरातील हिंदू बांग्लादेशातील हिंदूना मदत करतील पुन्हा एकदा हिंदूत्वाचा नारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संकटग्रस्त बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीवर एक स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले की, जर त्या देशातील हिंदू लोकसंख्येने आपल्या हक्कांसाठी उभे राहून लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना जगभरातील हिंदूंचा पाठिंबा मिळेल. मुंबईत आरएसएसच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, “बांग्लादेशात सुमारे १.२५ …

Read More »

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारली संसदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी, २०२६) सांगितले की, गेल्या १० वर्षांत रेल्वे विभागाची आर्थिक स्थिती खूप सुधारली आहे आणि सर्व खर्च भागवल्यानंतर आता विभागाकडे थोडा महसूल शिल्लक आहे. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४-२४ या काळात ५.०४ लाख नोकऱ्या …

Read More »

हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही …

Read More »