राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके करपून गेली आहेत. कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करुन मदत दिली त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत द्यावी, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही नाना पटोले यांना केली. नाना पटोले पुढे …
Read More »आकाश फुंडकर यांची माहिती, महाराष्ट्रातील कामगार कल्याणकारी योजनांचे सुलभीकरण वेळेवर निधी उपलब्ध होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी योजनांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. निधी संकलनात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळेवर निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले. आकाश फुंडकर पुढे म्हणाले की, कामगारांच्या युनिक आयडीसह त्यांच्या स्थलांतराची नोंद एकात्मिक पोर्टलवर ठेवणे आवश्यक आहे. एका …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार महाराष्ट्र मंडळाच्या सोहळ्यात 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने उपमुख्यमंत्री सन्मानित
जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास कामाच्या नावाखाली मुंबईची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कामावर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. भ्रष्टाचार व टक्केवारीत मग्न असलेल्यांना न्यायालयाने मोठी चपराक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.
महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे व वसुली करणे एवढ्याच कामासाठी उरलेले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याला देवेंद्र फडणवीस यांचा दळभद्री कारभार जबाबदार आहे. राज्यात मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, असा संतप्त प्रश्न विचारून …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात मिरची पूड फेकून बँकेत लूटीचा डाव पण आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडला गेला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका शाखेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून लुटालूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आले. सूरज भोजराज बोरकर (वय २८) असे या आरोपीचे नाव असून, तो बी.एस्सी. पदवीधर आणि सध्या बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. …
Read More »भाजपाचे मुख्यमंत्री सुवेंद्रु अधिकारी यांनी काली मातेच्या पुजेनंतर मांसाहारी जेवणाचा भोग घेतला मांसाहारामुळे मुख्यमंत्री राजकिय आणि सांस्कृतिक चर्चेच्या प्रमुख्यस्थानी
कोलकात्याच्या शेकडो वर्षे जुन्या कालीघाट मंदिरात माशांचा ‘भोग’ (नैवेद्य) घेताना दिसल्यामुळे पश्चिम बंगालमधील भाजपाचे मुख्यमंत्री नेते सुवेंदू अधिकारी हे राजकीय आणि सांस्कृतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दुर्गापूजेदरम्यान मांसाहारावरून वाद सुरू असतानाच त्यांनी हा पारंपरिक नैवेद्य ग्रहण केला. शाक्त हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या ‘कौशिकी अमावस्ये’च्या निमित्ताने सुवेंदु अधिकारी यांनी …
Read More »हुथी बंडखोरांच्या विरोधातील कारवाईतून पाकिस्तानचा काढता पाय सौदी अरेबियाची अमेरिकेकडे धाव अमेरिकेचा थेट लष्करी कारवाई करण्यास नकार
इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या लष्करी आणि तेल सुविधांवर जोरदार हल्ले चढवल्यानंतर, सौदी अरेबियाला आपल्या संरक्षण भागीदारांबाबत एक कटू धडा मिळाल्याचे दिसून येते. हुथींविरुद्धच्या लष्करी कारवाईच्या धमक्यांमधून पाकिस्तानने माघार घेतली आणि ज्या ‘मक्का संरक्षण करारा’ची खूप चर्चा झाली होती त्याबाबतही ते डगमगले; अशा वेळी सौदी अरेबियाने मदतीसाठी अमेरिकेकडे धाव घेतली. …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेट दिली तिरुक्कुरल यांच्या तामीळ ग्रंथाची प्रत लिओ टॉलस्टॉय यांनी तिरूक्कुरल यांना वाचण्याची शिफारस महात्मा गांधी यांना केली होती
नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना प्राचीन तामिळ अभिजात ग्रंथ ‘तिरुक्कुरल’ची रशियन आवृत्ती भेट दिली. ही भेट विशेष महत्त्वाची ठरली कारण या ग्रंथाचा रशियाशी जुना, तरीही फारसा ज्ञात नसलेला संबंध आहे; रशियामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाने शतकानुशतके तिथल्या लेखकांवर आणि विचारवंतांवर …
Read More »ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट दोन्ही नेत्यांकडून विविध विषयांवर भारत आणि रशिया संबध दृढ करण्यासाठी चर्चा
नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली; या चर्चेत संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाबाहेर आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन यांचा हा …
Read More »
Marathi e-Batmya