Breaking News

अजित पवारांनी केली मुंडे भगिनींवर टीका त्यावर माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या… योग्य उमेदवार निवडूण द्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे जरी बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द असले तरी त्यांच्या अधून-मधून राजकीय कोट्या करणारा आणि मिश्किल स्वभाव सर्वश्रुत आहे. नुकताच त्यांचा बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर विकास कामांच्या प्रश्नावरून टीका केली. त्यावर भाजपाच्या माजी …

Read More »

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, “विक्रांत”च्या पैशातून तुम्ही घरचं राशन भरलं… कोल्हापूरतील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी काढले उट्टे

भाजपाले आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण ज्या युध्द नौकेने पाकिस्तानला पाणी पाजलं ती युध्द नौका तुम्ही विकायला काढली. बर त्याच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलात. पण त्या पैशाचे काय केलात तर तुम्ही तुमच्या घरचं राशन भरलात. भाजपा इतकी कोडगी आहे की ज्याने त्या विक्रांतच्या नावावर पैसे जमा करून गायब केले …

Read More »

उध्दव ठाकरेंचा टोला, आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान की गावचा सरपंच कोल्हापूरच्या ऑनलाईन निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री ठाकरेंची टोलेबाजी

आमच्या बॅनरवर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र तुमच्या बॅनरवर लालकृष्ण अडवाणी आहेत, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आहेत. मात्र तुमच्या गावच्या सरपंच पदासाठीही तोच फोटो, पंतप्रधान पदासाठीही तोच फोटो आणि राज्याच्या निवडणूकीतही तोच फोटो त्यामुळे आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की, गावचा सरपंच …

Read More »

मनसेच्या टीझरला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर, जडे इतनी कमजोर नही की…. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा शायरीतून इशारा

गुढी पाढव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवित राज्यातील जातीयतेला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरविले. त्यानंतर शरद पवार यांनी सूचक शब्दात राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच इतर राजकिय पक्षांच्या नेत्यांनीही राज ठाकरेंवर चांगलीच टीकेची झोड उठविली. या टीकेला …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेत त्रुटी… न्यायालयाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्री वळसेंची प्रतिक्रिया

काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला करत आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगडफेकही केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना अटक करून न्यायालयातही हजर केले. त्यावर न्यायालयाने या …

Read More »

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्य व देशभर पडसाद राष्ट्रवादीने केले काळयापट्टया बांधून मूक आंदोलन...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून आज राज्यभर आणि गोवा राज्यात काळयापट्टया बांधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी, युवक, युवती व महिला यांनी मूक आंदोलन केले. शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने भ्याड हल्ला केला त्यानंतर राज्यभर तणावाचे …

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक न्यायाची स्थापना केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या याच सामाजिक न्यायाची भूमिका नंतर संविधानात घेतली. अमेरिकेनेही त्याच धर्तीवर सकारात्मक कृती योजनेच्या माध्यमातून ती राबवली. याचा सर्वांगिण विचार करता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, सीबीआय-ईडीच्या भीती पोटी मायावतींनी हे सगळं केलं उत्तर प्रदेशातील निवडणूका त्या लढल्या नाहीत

नुकत्याच पंजाबसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. परंतु निवडणूक काळात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीकरीता युतीसाठी बहुजन समाज पार्टीला विचारणा करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. युतीसाठी त्यांना मेसेजही केला. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मात्र त्यांना सीबीआय ईडीची भीतीने त्यांनी युती केली नसावी …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे प्रतिष्ठीत नेते, आमचं सरकार लक्ष देईल मुख्यमंत्री प्रकरण हाताळत आहेत

काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वर हल्ला करत आंदोलन केले. या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यात न्यायालयानेही सदावर्तेंना दोन दिवस पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या …

Read More »

सदावर्तेंना दोन दिवस पोलिस तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी जामीन अर्ज फेटाळला

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्या १०९ जणांबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर आज किल्ला कोर्टात या सर्वांना हजर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीत गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यापैकी १०९ जणांना …

Read More »