Breaking News

व्यापार, सूक्ष्म लघु उद्योगांच्या पदरी निराशा कृषी, पायाभूत सुविधा व स्टार्ट अप क्षेत्रासाठी भरीव तरतुदी स्वागतार्ह - ललित गांधी

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी तितकासा आशादायक नाही असं म्हणावं लागेल. परंतु त्याच बरोबर केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे व शेती क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यापार उद्योगाला …

Read More »

अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडणे अशक्य महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम- अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण २ लाख २० हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या …

Read More »

मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान …

Read More »

भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील …

Read More »

हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता ? या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम महागाई वाढल्याने करामध्ये सूट मिळेल अशी अपेक्षा मध्यमवर्गीय नोकरदारवर्गाला होती, मात्र या अर्थसंकल्पातून तसं दिसलं नाही आणि तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना केली. दरम्यान या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या …

Read More »

मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी ‘अर्थ’हीन ७० वर्षात उभारलेले सर्व विकून खाणे हेच मोदी सरकारचे धोरण-बाळासाहेब थोरात

मराठी ई-बातम्या टीम मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून त्यांनी आज …

Read More »

अर्थसंकल्प सादर: कोणत्या नव्या घोषणा केल्या अर्थसंकल्पातून ? वाचा ९ टक्के जीडीपी वाढीचा दिड तासात देशाचा अर्थसंकल्प सादर

मराठी ई-बातम्या टीम देशाचा २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर करत देशाच्या विकासाच्या आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने धोरण काय असेल याचे धोरण अर्थसंकल्पात सादर करण्यात आले. डिजीटल अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो करन्सी जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक …

Read More »

१५ हजार नवे बाधित तर ३५ हजार बरे होवून घरी गेले: ९१ ओमायक्रॉन रूग्ण ३९ बाधितांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत सातत्याने घट येत असून आज मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यात १५ हजार १४० रूग्ण आढळून आले आहेत. तर  ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२% एवढे …

Read More »

आम्हा १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्या भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी लिहीले विधानसभा सचिवांना पत्र

मराठी ई-बातम्या टीम पीठासीन अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. विधानसभेच्या या निर्णयाविरोधात त्या १२ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयावर निकाल देताना राज्यातील महाविकास आघाडीला फटकारे लगावत निलंबनाचा निर्णय रद्दबातल ठरविला. त्यानंतर सत्ताधारी आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर भाजपाचे निलंबित …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिले “हे” आदेश विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्यामागे एकादी शक्ती असावी

मराठी ई-बातम्या टीम आज दिवसभरात मुंबईसह राज्यातील नागपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबादेत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या दोन्ही वर्गाच्या परिक्षा ऑनलाई घ्या किंवा परिक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अचानक विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्यामागे नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न राज्य …

Read More »