Breaking News

शेलारांचे मलिकांना प्रत्युत्तर, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्या फोटोवरून शेलार आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा असल्याचे प्रत्युत्तर भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथआ अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास आणि भविष्यही नाही के.सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील काँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न

सेवाग्राम: प्रतिनिधी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस …

Read More »

गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, चौकशी होणार मात्र दंगलीची दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

नागपूरः प्रतिनिधी त्रिपुरातील कथित व्हिडीओमुळे अमरावती, नांदेड, मालेगांव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर देताना वरील उत्तर दिले. मात्र याप्रकरणी भाजपाकडून रझा …

Read More »

सप्टेंबर तिमाहीत ओएनजीसीला विक्रमी नफा, रिलायन्सला मागे टाकले टाटाचाही विक्रम मोडला

मुंबईः प्रतिनिधी सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) एक विक्रम केला आहे. ओएनजीसी ही कोणत्याही एका तिमाहीत देशातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने १८,३४७.७३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आतापर्यंत कोणत्याही एका तिमाहीत सर्वाधिक नफा कमावण्याचा विक्रमही सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या नावावर होता. …

Read More »

मलिकांचा सवाल, रझा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करत होते? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात हिंसाचार होण्याच्या आधी भाजपाचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून काय करत होते?, कोणाशी बैठक करत होते ? असा सवाल करत अमरावती येथील हिंसाचारासाठी मुंबईतील आमदाराने पैसे पाठविले असून त्यासाठी तेथील तरूणांना पैसे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात …

Read More »

‘या’ दोन कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात फक्त १५ हजार रूपयांची गुंतवणूक करा

मुंबईः प्रतिनिधी पुढील आठवड्यात दोन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. आयपीओतून या दोन्ही कंपन्या मिळून २ हजार कोटींहून अधिक रक्कम उभारणार आहेत. यासह पॉलिसी बाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेकचे शेअर बाजारात लिस्टिंगही होणार आहे. गो फॅशनचा अंक आयपीओ १७ नोव्हेंबरला सुरू होऊन २२ नोव्हेंबरला बंद होईल. कंपनी आयपीओमार्फत १,०१३ कोटी रुपये …

Read More »

राज्यातील हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात काही ठिकाणी नुकताच झालेला हिंसाचार रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे घडवून आणला आहे. या हिंसाचाराबद्दल रझा अकादमीवर बंदी घाला आणि रझा अकादमी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा, अशा मागण्या भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केल्या. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

रेल्वे तिकीट दर ३० टक्क्यांनी स्वस्त होणार १४ तारखेला फक्त आरक्षण करता येणार नाही

मुंबईः प्रतिनिधी रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) अपग्रेड करत आहे. हे अपग्रेडेशन १४ नोव्हेंबरच्या रात्री ते २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत होईल. या दरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या वेळेत रेल्वे तिकीट बुक करता येणार नाही. यामध्ये नवीन ट्रेनची संख्या आणि इतर डेटा अपग्रेड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेची लांब …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवभक्त आणि पुणेकरांकडून अखेरचा निरोप वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती. …

Read More »

काँग्रेस जनतेच्या दरबारात महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’!: नाना पटोले

वर्धा- मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, दुकानदार यांना भांडवलदारांचे गुलाम करुन मोदी सरकारने जगणे कठीण केले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश २५ वर्षे मागे गेला असतानाही जनतेच्या हिताचे निर्णय …

Read More »