Breaking News

राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…वाचा कोण कुठे बदलून गेले प्रविण दराडे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ.कलशेट्टी, डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह अन्य जणांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यावर कोसळलेल्या अतिवृष्टी संकटामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्री असताना आज १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांच्या पत्नीं पल्लवी दराडे यांच्यासह अन्य १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सनदी अधिकारी प्रविण दराडे यांची समाज कल्याण …

Read More »

दौरा अतिवृष्टीग्रस्ताचा मात्र राजकारण रंगले फडणवीस-मुख्यमंत्री आणि पवार-राज्यपाल-पाटलांचे निम्म्या महाराष्ट्रावर संकट ओढावलं तरी राजकिय नेत्यांच्या टीका टिपण्या सुरूच

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यत अनेक लहानमोठ्या गावात अतिवृष्टीमुळे घरे वाहून गेलीत तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी शेत पिके जमिनीसकट वाहून गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही काळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या उभा राहील का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच या आपद्कालीन …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीग्रस्तांना धीर देत म्हणाले…. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल

अक्कलकोट : प्रतिनिधी आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त …

Read More »

पवारांची स्पष्टोक्ती अतिवृष्टीच्या निमित्ताने राज्यावर आर्थिक संकट, पण दिले हे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी बोलून विनंती करणार पाहणी दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची माहिती

तुळजापूर: प्रतिनिधी संकटाचं स्वरूप लक्षात घेता स्थानिक लोकांशी बोलल्यावर आणि प्रत्यक्षात पाहिल्यावर महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यावर आर्थिक संकटही आलं नाही. पण या पावसाने आणलंय. त्यामुळे आता या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही आणि ते कर्ज आपण काढणार असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांशी बोलून कर्ज काढण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी …

Read More »

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं …

Read More »

कोरोना: आठवड्याच्या सुरुवातीलाच बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट ९ हजार ६० नवे बाधित, ११ हजार २०४ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत घट आढळून आली असून आज ९ हजार ६० रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ८२ हजार ९७३ वर पोहोचली आहे. तसेच ११ हजार २०४ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १३ …

Read More »

मंदिरप्रश्नी आंदोलन करणारी भाजपा महिलांच्या लोकल प्रवासावर गप्प का ? रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »

फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

मंत्री वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांना दिले हे आश्वासन वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू सांगत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

नांदेड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला …

Read More »