Breaking News

दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास …

Read More »

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …

Read More »

“त्या” पत्रानंतरही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला अजित पवारांना महत्वाचा “शब्द” महाविकास आघाडीला तुर्तास कोणताही धोका नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी २५ वर्षाच्या अभेद्य युतीला रामराम करत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केल्याने शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना केंद्रिय यंत्रणांमार्फत त्रास देण्याचे काम सुरु असल्याने आपण पुन्हा एकदा भाजपासह जुळवून घ्यावे अशी विनंती करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अजित …

Read More »

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट अलमट्टी धरण पाण्याविषयी दोन्ही राज्यांचा योग्य समन्वयासाठी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या तर भाजपाला टोले शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी साधला शिवसैनिकांशी संवाद

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काहीजण स्वबळाचा नारा देत आहेत. पण स्वबळाचा नारा म्हणजे फक्त निवडणूकी पुरताच नसतो. अन्यायाच्या विरोधात वार करण्यासाठी ते उचलण्यासाठी लागंत ते स्वबळ असत. त्यासाठी स्वबळ कमावावे लागते असा टोला काँग्रेसचे नाव न घेता लगावत कोरोनानंतरची परिस्थिती आणि येणाऱ्या आर्थिक संकटाचा कोणताही विचार न …

Read More »

“फ्लाईंग सिख” यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार बॉलीवूड सेलिब्रेटीसह अनेकांकडून आदरांजली

चंदीगड: वृत्तसंस्था/ प्रतिनिधी आपल्या धावण्याच्याबळावर किमान काही काळ तरी भारत-पाकिस्तान मधील तणावाचे संबध तणावविरहीत करण्याची किमया साधणारे फ्लाईंग सिख अर्थात जीव मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे काल शुक्रवारी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चारच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे निधन …

Read More »

दहा मानाच्या पालख्या ” लाल परी ” ने विठ्ठल भेटीला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार …

Read More »

पॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट

मुंबई : प्रतिनिधी कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे २१ जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात १६ हजार ५७० ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या ३५ हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. राज्यात त्या क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा …

Read More »

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …

Read More »