Breaking News

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा भाजप सरकारचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे कृषीक्षेत्रात कंपनीराज येणार असल्याची टीका …

Read More »

आंबेडकरी साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन : अनेक मान्यवरांची आदरांजली वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नागपूर-मुंबई : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्ये, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रणेते, बौध्द दलित साहित्यात चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यक डॉ भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी पहाटे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पाली विभागाचे ते रिडर आणि डॉ.बाबासाहेब …

Read More »

हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करायचाय थांबा परवानग्यांची संख्या कमी होणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : प्रतिनिधी हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ …

Read More »

आमच्याबद्दल प्रेम असल्याने इन्कम टॅक्स विभाकडून नोटीस त्या दोघांना नाही मात्र स्वत:ला नोटीस मिळाल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी निवडणूकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या माहितीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य मंत्रिमंडळातील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या त्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे निवडणूक आयोगाने तपासणीचे आदेश दिले आहेत. मात्र सुप्रिया सुळेंना याबाबतची तशी नोटीस अद्याप आलेली नाही पण आयकर अर्थात इन्कम टॅक्स विभागाकडून निवडणऊक आयोगाच्यावतीने पाठविलेली नोटीस आपल्याला मिळाली …

Read More »

पाठिंबा म्हणून एक दिवस अन्नत्याग; उपाध्यक्षांच्या भूमिकेने त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले त्याला पाठिंबा देत आज एक दिवसाचे अन्नत्याग करत उपाध्यक्षांच्या तथाकथित गांधीगिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज …

Read More »

कोरोना : बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद ३२ हजार ०७ रुग्ण घरी, १५ हजार ७३८ नवे बाधित ३८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून …

Read More »

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक …

Read More »

प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कॉलेजमधील १०० टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द : वाचा नवा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व काँलेजमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापना कार्यालयात १०० टक्के उपस्थित रहावे असे आदेश राज्य सरकारने काही दिवसांपुरते दिले होते. मात्र त्यावर सर्वचस्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्याने अखेर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेत परिक्षेच्या कालावधीत आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करत इतरांना त्या त्या वेळेनुसार …

Read More »

नरेंद्र मोदींचे असत्य कथन उठले देशाच्या मुळावर शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात !-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहचले आहे. काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्याचा अहवाल देण्यास एनसीआरबीने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या …

Read More »

आरक्षण अंतरिम स्थगिती विरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल राज्य सरकारची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर न्यायालयाच्या याच निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने पुन्हा विनंती अर्ज आज दाखल केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकाल जर रद्द केला तर राज्यातील मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षणाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. मराठा आऱक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने …

Read More »