मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६,००,००,००० रुपयांचे टेंडर काढले. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे …
Read More »आंबेडकर म्हणतात अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, देशमख म्हणाले ते वाक्य चुकीचे तोंडी पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यानी केल्याचे वृत्त एका वृतपत्रात प्रसिध्द झाले. मात्र ते वाक्य माझ्या तोंडी चुकीचे पध्दतीने टाकल्याचा खुलासा एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी त्या द्रोह करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर …
Read More »महाविकास आघाडीविरोधात भाजपाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणत असल्याची भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह तीन खासदांराचे पत्र
मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून डिसेंबर २०१९ पासून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि प्रसारमाध्यमांच्या फ्रिडम् ऑफ स्पीच या संकल्पनेवर गदा आणली जात आहे. तसेच राज्यात राज्य सरकार पुरस्कृत गुंडागर्दी सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित करत मानवी हक्क आयोगाने यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते तथा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, …
Read More »कोरोना : सलग २ ऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त : मृतक ही ४०० पार २१ हजार ९०७ नवे बाधित रूग्ण, २३ हजार ५०१ बरे झाले तर ४२५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज २१ हजार ९०७ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होवून २ लाख ९७ हजार ४८० वर पोहोचली. तर २३ हजार …
Read More »वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती
मुंबई: प्रतिनिधी बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना …
Read More »खुशखबर : या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुंबईत होणार ३ हजार ४०१ पदांची भरती महास्वयंम संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉग इन करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या …
Read More »विधेयकाच्या समर्थनासाठी भाजपाला झाली शेतकरी नेते शरद जोशींच्या चळवळीची आठवण शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान मोदींचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा देण्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कायदा करण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी मा. पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत याच स्वातंत्र्यासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी …
Read More »कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …
Read More »साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई: प्रतिनिधी जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या तथा कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांचे आज दुपारी १२.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या. तसेच मागील काही महिन्यापासून त्या आजारी होत्या. पाचव्या लोकसभेमध्ये त्यांनी उत्तर मध्य मुंबईचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच त्या कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय …
Read More »क्विन नेकलेस प्रकरणी दुटप्पीपणा उघड भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकारने वीज बचत व्हावी व पर्यावरण पुरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्विन नेकलेसची शोभा जाईल अशी ओरड करण्यात आली होती. हे जे ओरडत होते त्यांनी क्विन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार …
Read More »
Marathi e-Batmya