उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्याना टोला

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६,००,००,०००  रुपयांचे टेंडर काढले. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

त्या सहा कोटींमध्ये २५ ते ३० हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या हा तरी विचार राज्य सरकारने करायला हवा होता असा उपरोधिक कोपरखळी लगावत उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी  काळजी घ्या असा उपरोधिक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *